malhar patil ajit pawar Ranajagjitsinha Patil sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar News : "अजितदादांनी आधी आम्हाला पाठवलं, मग ते भाजपबरोबर आले", राणाजगजितसिंह पाटलांच्या पुत्राचं विधान

Malhar Patil On Omprakash Raje Nimbalkar : "खासदार म्हणून लोकांची कामे करायला पाठवलं, पण...", असं आव्हान ओमप्रकाश राजे निंबाळकरांना दिलं.

Akshay Sabale

धाराशिव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील ( Archana Patil ) यांचे पुत्र मल्हार पाटील ( Malhar Patil ) यांनी केलेलं एक विधान चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्यावर विश्वास ठेऊन अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या सहमतीनं 2019 मध्ये राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. अजितदादांनी आम्हाला भाजपमध्ये आधी पाठवलं आणि आता तेही भाजपबरोबर आले आहेत, असं मल्हार पाटलांनी म्हटलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल करताना मल्हार पाटील ( Malhar Patil ) म्हणाले, "35 वर्षे डॉ. पद्मसिंह पाटील आमदार आणि मंत्री राहिले. तेव्हा ओमराजेंचे वडील पद्मसिंह पाटील यांचं काम करायचे. मग पद्मसिंह पाटील यांनी 35 वर्षे काय काम केलं? असा प्रश्न तुम्ही ( ओमराजे ) कसा काय विचारू शकता. तुमच्या वडिलांनीच 35 वर्षे काही काम केलं नाही. लोकांची दिशाभूल करणं, खोटं बोलण्याचं काम ओमराजे करतात."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप"

"ओमराजे म्हणतात, आम्ही अजितदादांमुळे राष्ट्रवादी सोडली. पण, ओमराजे खोटे बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेऊन अजितदादांच्या सहमतीनं 2019 मध्ये राष्ट्रवादी सोडून आम्ही भाजपत प्रवेश केला. अजितदादांनी आम्हाला आधी भाजपत पाठवलं आणि आता ते भाजपबरोबर आले आहेत. त्यामुळे ओमराजेंनी आमची काळजी करू नये. आमच्या रक्तात राष्ट्रवादी, हृदयात भाजप, हातात धनुष्यबाण आहे," असं मल्हार पाटलांनी म्हटलं.

"पाच वर्षांत केलेलं काम सांगावं"

"खासदारांकडे मुद्दे आणि लोक नाहीत. फक्त फेसबुक आणि सोशल मीडियावर असतात. त्यातच त्यांचं आयुष्य गेलं आहे. पाच वर्षे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पूर्ण प्रचार केला. खासदार म्हणून लोकांची कामे करायला पाठवलं. पण, पाच वर्षांत मतदारसंघात केलेलं एक काम सांगावं," असं आव्हान मल्हार पाटलांनी ओमप्रकाश राजे निंबाळकरांना दिलं.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT