Beed Mahayuti Melava  sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Election 2024 : बीडच्या लोकसभा जागेसाठी धनंजय मुंडे मैदानात, बहिणीसाठी...

Beed Mahayuti Melava : बॅनरवर माझा फोटो नसला तरी चालेल, परंतु दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असावा, असे आवाहन धनजंय मुंडे यांनी केले.

Dattatrya Deshmukh

Beed : महायुतीचा घटक म्हणून भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) एकत्रित आले आहेत. त्यामुळे बीडच्या जागेवर भाजपचा उमेदवार असणार हे नक्की. भाजपकडून खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. त्यावरून महायुतीच्या समन्वय बैठकीत मंत्री धनजंय मुंडे यांनी मोठी घोषणा केला.

आता महायुतीची धुरा मी माझ्या खांद्यावर घेत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून डॉ.प्रीतम मुंडे (pritam munde) या देशातून सर्वाधिक मतांनी वियजी होतील, असा विश्वास कृषी मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी व्यक्त केला. बॅनरवर माझा फोटो नसला तरी चालेल, परंतु दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा फोटो असावा. त्यांचे विचार पुढील अनेक वर्ष जिवंत राहणार आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावपातळीवरील मतभेद सोडून द्या, असे आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी केले.

मतभेद सोडून द्या...

महायुतीच्या मित्रपक्ष संमेलनात धनंजय मुंडे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादीसह मित्रपक्षांच्या नेत्यांनी डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा विश्वास दिला. धनंजय मुंडे यांनी व्यासपीठावरील नेत्यांची गर्दी पाहून ‘माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला’ म्हणत असेच एकत्र राहण्याचा सल्ला दिला. गोपिनाथ मुंडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावपातळीवरील मतभेद सोडून द्या, सर्वजण एकत्र येऊन देशाच्या हितासाठी, प्रतिष्ठेसाठी महायुतीला साथ द्या, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

विधासभेतही महायुती अभेद्य

जिल्ह्यासह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट असून दुष्काळमुक्तीसाठी लागेल ते करू. कोट्यवधींचा निधी खेचून आणू. जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबध्द आहे, अशी ग्वाही देत गावापासून देशपातळीपर्यंतची महायुती मजबूत करावी असे सांगत महायुती लोकसभा निवडणुकीपुरतीच न राहता पुढेही विधानसभा निवडणुकीत अशीच अभेद्य राहावी, असे आवाहन मुंडे यांनी केले. प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांनी केले. सूत्रसंचलन ज्ञानदेव काशीद यांनी केले. आभार अविनाश नाईकवाडे यांनी मानले.

दिग्गजांची उपस्थिती

खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, माजी मंत्री सुरेश नवले, शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मित्र पक्ष संमेलनाचे समन्वयक तथा माजी आमदार अमरसिंह पंडित, आर. टी. देशमुख, भीमराव धोंडे, संजय दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, रमेश आडसकर, मोहन जगताप, सलीम जहांगीर, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे, सचिन मुळूक, अनिल जगताप, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष नारायण काशीद, गेवराई मतदारसंघाचे युवा नेते विजयसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बबनराव गवते, बीड विधानसभा अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, अनिल तुरुकमारे, प्रहारचे विलास कोळांके आदी महायुतीच्या मेळाव्याला उपस्थित होते.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT