Dharashiv News, 5 May : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी मराठवाड्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी मोठी योजना आखली होती. मराठवाड्यातील 11 धरणांना वॉटर ग्रीडच्या माध्यमातून जोडण्यात येणार होते. त्यासाठी 34.50 हजार कोटीची योजना मंजूर झाली. यात 23.66 टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. यात उजनी धरणातून 7 टीएमसी आणि गोदावरी खोऱ्यातून उर्वरित पाणी येणार होते.
या माध्यमातून भूम, परंडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर, उमरगा, आष्टी येथील सर्व गावांना पाणी मिळणार होते. मात्र, दुर्दैवाने ठाकरे ( Uddhav Thackeray ) सरकारच्या काळात जाणीवपूर्वक सर्व योजनांवर स्टे आणला गेला. त्यामुळे मराठवाड्यावर मोठा अन्याय झाला, असा आरोप भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील ( Ranajagjitsinha Patil ) यांनी केला. परंतु, आता आपल्या हक्काचे सरकार आले आहे. सर्व योजना पुन्हा सुरू होतील, सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होतील, असा दावा त्यांनी शिराढोण येथील प्रचार सभेत केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे आवाहन करतानाच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय मराठा महासंघाने महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी सांगितलं.
"सरकारच्या विविध खात्यांमध्ये निवड झालेले मराठा युवक आरक्षण रद्द झाल्यामुळे नियुक्ती पासून वंचित राहिले होते. आपण धाडसी निर्णय घेऊन जवळपास 200 मराठा विद्यार्थ्यांना पद अधिक ग्रहण कायद्यानुसार नियुक्त्या दिल्या होत्या. मराठा महासंघाने आपल्या सरकारला जाहीर पाठिंबा देत मराठा समाजाचे जो कोणी प्रश्न सोडवेल त्यांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठा महासंघ सदैव उभा राहील," असे आवर्जून नमूद केल्याचे पाटील यांनी सांगितले.
"सबका साथ, सबका विकास साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर निवडून देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असताना आपले लोकसभा क्षेत्र यामध्ये विजयी भूमिका बजावणार आहे. विरोधकांकडे आज मुद्दे नाहीत, इतके काम मोदीजींनी करुन ठेवले आहे. 400 पार का नारा हे देशवासीय सत्यात आणतील. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा क्षेत्रात विजयाचा आणि पर्यायाने विकासाचा निर्धार करण्यात आला आहे," असेही राणा पाटील यांनी सांगितले.
( Edited By : Akshay Sabale )
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.