Uddhav Thackeray News : विशाल पाटलांच्या बंडखोरीचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंनी मोजक्या शब्दांत संपवला विषय

Uddhav Thackeray On Eknath Shinde : "गद्दारी झाली नसती, तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राला पुढं घेऊन गेलं असतं," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
Vishal Patil News
Vishal Patil News Sarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : 'आता नाही तर कधीच नाही' अशी घोषणा करत माजी मुख्यमंत्री, स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आपले बंडाचे निशाणा कायम ठेवले. विशाल पाटलांच्या पवित्र्यामुळे सांगलीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अडचणीत आली असून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे. या बंडखोरीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोजक्या शब्दांत विषय संपवला आहे.

काँग्रेसचे उमेदवार नागेश आष्टीकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नांदेडमध्ये आले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा, विशाल पाटलांच्या (Vishal Patil) बंडखोरी प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "विशाल पाटील महाविकास आघाडीचे नाहीत. त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्यावर काँग्रेस कारवाई करेल."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"गद्दारी झाली नसती, तर महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्राला पुढं घेऊन गेलं असतं. देशातीतल हुकूमशाहीविरोधात देशात लाट उसळली आहे. सगळ्यांच्या मनात घटना बदलतील अशी भीती आहे. गेल्या काही वर्षांची वाटचाल तशीच दिसत आहे," अशी चिंता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.

Vishal Patil News
Vishal Patil News : सांगलीत तिरंगी लढत; काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर ?

"मोदींनी शिवसेनेला नकली सेना म्हटलं. पण, 'तुमच्या साताऱ्याबारील शिवसेनेचं नाव निवडणूक आयोगानं खोडलं. उद्या आमचा आमचा सातबारा खोडून उपऱ्यांची नावं लावली, तर आम्ही काय करायचं,' असा प्रश्न शेतकऱ्यांनी माझ्याकडे उपस्थित केला," असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. "राज्यात महाविकास आघाडीचे 48 खासदार निवडून येतील," असा विश्वास उद्दव ठाकरेंनी व्यक्त केला.

Vishal Patil News
Uddhav Thackeray News : 'जय भवानी' शब्दावर आक्षेप घेणाऱ्या आयोगाच्या नोटीसीला ठाकरेंकडून केराची टोपली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com