Uddhav Thackeray News : ... तर मीही मोदीजी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन; धाराशिवमधून उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

Shivsena News : मोदीजी तुमच्यावर जर कसले संकट आले तर खंबीरपणे पाठीशी उभा राहणार, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील प्रचारसभेप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Dharashiv News : तुम्हाला माझ्याविषयी जेवढे प्रेम आहे त्याच प्रमाणे मला देखील आपल्याबद्दल प्रेम आहे. मोदींजीं तुमच्यावर जर कसले संकट आले तर खंबीरपणे पाठीशी उभा राहणार, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील प्रचारसभेप्रसंगी बोलताना स्पष्ट केले. 'जय भवानी, जय शिवाजी' या वर निवडणूक आयोगाने घेतलेले आक्षेप मागे घ्यावेत, असेही यावेळी त्यांनी ठणकावून सांगितले

धाराशिव येथील महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omprkash Rajenimbalakar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नेतेमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते. (Uddhav Thackeray News)

Uddhav Thackeray
Devendra Fadnavis: 'दिल्ली'तून बांधली जातेय फडणवीस विरोधकांची मोट? खडसेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा अन्...

संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाला कोणी जवळ घेत नव्हते तेव्हा शिवसैनिकांनी, शिवसेनेने त्यांना खांद्यावर घेत महाराष्ट्रभर फिरवले. नरेंद्र मोदी हे शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत. हे फक्त खोकेबाज नाहीत. हे नालायक आहेत.सर्वोच्च न्यायालयात अजून हे प्रकरणाचा निर्णय झाला नाही. नकली शिवसेना म्हणत सर्वोच्च न्यायालयावर नरेंद्र मोदी दबाव आणत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तुम्हाला राजकारणामुळे मुलं होत नाहीत. तुम्ही आमच्यातले चोरून घेऊन जाता. त्यातले गद्दार चोरून तुम्हाला राजकारण करावे लागते, हे आमचे यश आणि तुमचा अपयश आहे. तुम्ही गद्दार चोरलेत पण जनता माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. ' खरे तर हे मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे. त्यांनी काल काय आश्वासन दिले ते यांना आज आठवत नाही. 2014 काय बोलले ते त्यांना 2019 ला आठवत नाही. आणि 2019 ला काय बोलले ते 2024 ला आठवत नाही. आता उद्या लोक यांना विसरणार आहेत.', असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

तुळजापुरच्या मंदिरात का नाही गेले?

या मंडळींनी माझा पक्ष चोरला, माझा पक्ष गद्दारांच्या हातात दिला. मोदी आत्मावर बोलतात. तुमच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यावर बोला. मोदी धाराशिवला गेले पण तुळजापुरच्या मंदिरात दर्शनासाठी का नाही गेले, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : 'मी सूड घ्यायला आलो आहे', उद्धव ठाकरे कडाडले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com