Narendra Modi Sarkarnama
मराठवाडा

Lok Sabha Elections 2024 : भाजप गावातून शोधणार लोकसभा विजयाचा मार्ग, असा आहे प्लॅन...

Jagdish Pansare

Political News : निवडणूक यंत्रणा कशी राबवावी अन् नेत्यांपासून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना कसे कामाला लावावे, हे भाजपकडून शिकण्यासारखे आहे, असं विरोधकही खासगीमध्ये बोलून दाखवतात. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने केलेल्या तयारीकडे पाहिले के ते पटते ही. विकसित भारत संकल्प यात्रेतून देशभरात निवडणुकीचे वातावरण तयार केल्यानंतर भाजपने लोकसभेतील विजयासाठी आता हमखास यश देणारा नवीन प्लॅन 'गाव चलो' आखला आहे. (Lok Sabha Elections 2024 )

'गाव चलो' (Gaon Chalo) मोहिमेतून लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख घरांना भेटी देण्याचे उदिष्ट भाजपने ठेवले आहे. भाजपच्या वतीने येत्या 4 ते 11 फेब्रुवारी दरम्यान व्यापक जनसंपर्कासाठी हे अभियान राबविले जाणार आहे. केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad ) यांच्यासह राज्याचे मंत्री, अतुल सावे यांच्यासह पक्षाचे सर्व सरचिटणीस, प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजपा वाटचाल करत आहे. तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या 10 वर्षातील प्रभावी कार्य, मागच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती सर्वसामान्य नागरीकापर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने 'गाव चलो' अभियान हाती घेण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मोदी गॅरंटी'चा प्रचार

मोदींची गॅरंटी काय आहे, हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या 10 वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके 'गाव चलो'च्या माध्यमातून वाटण्यात येणार आहेत. शहरी भागातही वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाणार आहे. भाजपचे प्रवासी नेते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणारअसून सर्व आमदार आजी व माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्ह्यातील प्रत्येक युनिटमध्ये प्रवास करणार आहेत. त्यांना सुपर वॉरियर्सचीही मदत दिली जाणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी सांगितले.

नेते गावात मुक्कामी

प्रत्येक युनिटमध्ये भाजपचा प्रवासी नेता एक दिवस मुक्काम करून, बुथ प्रमुखांच्या बैठका, नागरिकांच्या भेटी, नवमतदारांशी चर्चा अशी आखून दिलेली 18 संघटनात्मक कामे करेल. तसेच जवळपास 890 बुथ वरील मतदारांना संपर्क करतील. गाव चलो अभियानांतर्गत लोकसभा मतदारसंघात साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT