Ashok Chavan News : उल्हासनगर घटनेवरुन माजी मुख्यमंत्र्यांचे 'ट्विट' ; म्हणाले, 'सरकारच्या विश्वासार्हतेवर...'

Ulhasnagar firing case : सत्ताधारी आमदाराने बेछूट गोळीबार केल्याच्या घटनेवरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केले प्रश्नचिन्ह उपस्थित.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Ashok Chavan News : उल्हासनगरमध्ये पोलिस ठाण्यातच घडलेल्या खुनी हल्ल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. भाजप आमदाराने त्यांचाच सोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला. या प्रकरणामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्य सरकारच्या कारभावर बोट ठेवले जात असून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनीही सरकारसमोर याप्रकरणी प्रश्न उपस्थित केले आहेत.

विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह...

गोळीबाराच्या घटनेने राजकीय वर्तुळत खळबळ उडाली आहे. सत्तेत असलेल्या दोन पक्षातील लोकांकडून एकमेकांवर आरोप केला जातो, ही बाब गंभीर असल्याचं विरोधकांकडून सांगितले जात आहे. उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात सत्ताधारी आमदाराने बेछूट गोळीबार केल्याची घटना अतिशय गंभीर आणि चिंताजनक आहे.

Ashok Chavan
Rahul Narwekar News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या नावाने पैशाची डिमांड; स्वीय सहायकाकडून...

हे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान नाही तर राज्य सरकारच्या न्यायदानाच्या कर्तव्यावर आणि विश्वासार्हतेवर लागलेले मोठे प्रश्नचिन्ह आहे, असा सवाल 'ट्विट' करत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणावरुन विरोधक आक्रमक होताना पहावयास मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणुकीसाठी गुंडांचा वापर...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एकनाथ शिंदे यांचा गुंडांशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. तर जशा निवडणुका जवळ येतील तसे हे प्रकार वाढतील, असा संकेत देखील त्यांनी दिला.

निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा सत्तेत येण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्या गुंडांना सक्रिय करतील आणि तुम्ही म्हणाल तो कायदा, आम्ही फक्त निवडून आलो पाहिजे अशा सूचना देतील, असा घणाघात अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीत गुंडांचा वापर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही...

उल्हासनगरमध्ये भाजपच्याच आमदाराकडून शिंदेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शिंदे पिता - पुत्र मला त्रास देत होते आणि याबद्दल मी वरिष्ठांशी बोललो. तरीही त्यांनी काही केल नाही. स्वतःचा बचाव करण्यासाठी मी गोळीबार केल्याचं स्पष्टीकरण गणपत गायकवाड यांनी दिलं आहे.

मात्र, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल, असं विधान उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजप आमदार असला तरीही घडलेला प्रकार चुकीचा आहे. म्हणून चौकशी करून कारवाई करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे.

(Edited by Amol Sutar)

Ashok Chavan
Raj Thackeray Nashik Tour : नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंनी जे केले ते राज ठाकरेंनी टाळले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com