Ashish Shelar Ambadas Danve  sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve On Ashish Shelar : आशिष शेलारांच्या कवितेला अंबादास दानवेंचे कवितेतूनच प्रत्युत्तर, ट्विटरवर रंगला सामना

Loksabha Election 2024 : भाजप नेते आशिष शेलार यांनी लोक कवी मधुकर घुसळे यांच्या कवितेचा आधार घेत महाविकास आघाडीवर टीका केली.

Jagdish Pansare

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत उद्धव ठाकरेंवर टीका करताना नकली शिवसेना असा उल्लेख केला होता. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नांदेड जिल्ह्यातील प्रचार सभेत पुन्हा उद्धव ठाकरे व शरद पवारांना उद्देशून शिवसेना आणि राष्ट्रवादीचा उल्लेख नकली पक्ष असा केला होता. यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये सोशल मीडियावर राजकीय युद्ध रंगले आहे. त्यारोप वाढत जातील.

भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी लोक कवी मधुकर घुसळे यांच्या कवितेचा आधार घेत महाविकास आघाडीवर टीका केली. मोदींच्या भीतीनं घेरलंया ! `यांना मोदींच्या भीतीनं घेरलंया !डोकं फिरलंया आघाडीचं डोकं फिरलंया ?"हाता"ला धरलंया म्हणिते गणित ठरलंया, अशा विडंबनात्मक कवितेच्या ओळी टाकून शेलारांनी महाविकास आघाडीला डिवचले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी लगोलग शेलारांच्या कवितेला त्यांच्याच भाषेत जशास तसे उत्तर दिले आहे.

यांना भ्रष्टाचाराचा भस्म्या झाला या, अशी विडंबनात्मक कविता ट्विटरवर पोस्ट करत दानवेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

भस्म्या झाला भाजपला भस्म्या झाला या,

खोटे बोलतीये, कचरा गोळा करती या..

हे पाही ना रात्रंदिस,

मोदी-मोदी पूजत बसं..

सारे भ्रष्टाचारी घेऊन कसं..

वॉशिंग मशीनमधून काढी असं..

खोटी गॅरंटी देत बसलया..

अशी विडंबनात्मक कविता दानवेंनी पोस्ट केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंबादास दानवे यांच्या या पलटवारानंतर भाजपकडून पलटवार केला जाणार? की मग हे राजकीय युद्ध तूर्तास थांबणार हे लवकरच स्पष्ट होईल. राज्यातील महाविकास आघाडीशी महायुतीचा थेट सामना होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असतांना दोन्ही बाजूंनी टीका, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या फेऱ्या जसजशा पुढे जातील तसतशी आरोप प्रत्यारोप वाढत जातील.

(Edited By Roshan More)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT