Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे नणंद विरुद्ध भावजय सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बारामतीकरांनी आत्तापर्यंत लेकीला निवडून दिले, आता सुनेला निवडून द्या. पवार आडनाव असेल तिथे मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. अजित पवारांच्या या आवाहनाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते.
बारामतीकरांनी पवार आडनावाच्या मागे उभं राहाययला हवे, त्यात चकू काय आहे? दोन गोष्टी असतात एक मूळ पवार आणि दुसरे बाहेरून आलेले पवार, असे शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले होते. त्यानंतर शरद पवार यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटातील महिला आक्रमक झाल्या होत्या.
शरद पवारांच्या या विधानवर सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांना अश्रू अनावर झाले.डोळ्यांना रुमाल लावत उत्तर न देताच त्या निघून गेल्या. या प्रश्नामुळे सुनेत्रा पवार भावनिक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. त्यामुळे कोणतेही उत्तर देण्याचे टाळत निघून जाणे त्यांनी पसंत केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार यांच्या विधानवरून अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारीच नाही तर शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनीदेखील ट्विट करत शरद पवारांवर टीका केली. ‘सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे, आमच्या महाराष्ट्रात… कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले… बारामतीच्या काकांचं हे वाक्य, ‘महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करून सासरी गेलेल्या सुनांचा अपमान’ आहे, असं ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी करत शरद पवारांवर निशाना साधला.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.