Sarakarnama
मराठवाडा

Rajni Patil News : सोनिया गांधींच्या विश्वासू रजनी पाटील यांना काँग्रेसने दिली 'ही' मोठी जबाबदारी!

Datta Deshmukh

Loksabha Election : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या राज्यसभा सदस्या खासदार रजनी पाटील यांच्यावर पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

सात राज्यांत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार चाचपणीसाठी काँग्रेसच्या समितीच्या त्या अध्यक्षा असतील. पक्षाचे सरचिटणीस सी. वेणूगोपाल यांनी याबाबत पत्र प्रसिद्ध केले आहे.

यात गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, दिल्ली, दमन आणि दीव, तसेच दादरा आणि नगर हवेली या राज्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा उमेदवार चाचपणी समितीच्या त्या अध्यक्षा असतील. समितीमध्ये कृष्णा अल्लावूरु व परगत सिंघ हे सदस्य आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत विविध राज्यांत उमेदवार निवडीसाठी तीन क्लस्टर समित्यांची शनिवारी घोषणा केली. यात तिसऱ्या क्लस्टर समितीत रजनी पाटील (Rajni Patil) अध्यक्षा असतील. रजनी पाटील या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या विश्वासू मानल्या जातात. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या त्या कायम निमंत्रित सदस्या आहेत.

यापूर्वी त्यांनी जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश राज्यांत पक्षाच्या प्रभारी म्हणून काम केलेले आहेत. सोनिया गांधींनी राजकारणात पाऊल टाकल्याच्या दिवसापासून त्यांच्या साथीदार असून राहुल गांधी यांच्याही त्या विश्वासू मानल्या जातात. दिवंगत खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पक्षाने त्यांना राज्यसभेची संधी दिली.

रजनी पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींच्या काळात एनएसयूआयमध्ये कामाला सुरुवात केली. सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकारणात पाऊल ठेवण्याच्या पहिल्या दिवशीपासून त्या त्यांच्यासोबत आहेत.

‘एनएसयुआय'च्या राज्य आणि राष्ट्रीय सचिव, पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या, कॉंग्रेसच्या महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा, महिला प्रदेश कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा, खादी ग्रामोद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आणि देशभर राबत असलेल्या केंद्रीय समाजकल्याण बोर्डाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळालेला आहे. त्यांनी युनोमध्येही भारताचे प्रतिनिधीत्व केलेले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT