Shinde Vs Thackeray : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे-ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू!

Shivsena News : विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून शक्तिप्रदर्शन
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Lok Sabha Constituency : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात घमासान होणार, असे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या एकसष्टी, तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या पंचाहत्तरीच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमातून केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर तशा चर्चांचा जोर वाढला आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी गेल्या 33 वर्षांच्या राजकारणात एकदाही वाढदिवस साजरा केला नाही. परंतु यंदा एकसष्टी जोरात केली. खासदार लोखंडे यांनी साजरा केलेल्या वाढदिवसामागे पुढच्या लोकसभा निवडणुकीचे गणित हे, उघड गुपित! खासदार लोखंडे यांनी यंदा हॅटट्रिक करायची तयारी सुरू केली आहे. यासाठी खासदार लोखंडे यांनी एकसष्टीनिमित्ताने शिर्डी लोकसभा मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे बोलले जाते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shinde Gat : ठाकरे गटाला घेरणार! मुंबई, ठाण्याच्या धर्तीवर शिंदे गटाचा नाशिकमध्ये बिग प्लॅन

विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहणार, असे सांगितले जात होते. पण कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे. तसेच मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनीही हजेरी लावली. निळवंडे कालव्याचे काम मार्गी लावण्यासाठी खासदार लोखंडे यांनी जोरदार संघर्ष केला. तशी स्थानिकांचीदेखील त्यांना साथ मिळाली. पुढे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या या संघर्षाला अधिक बळ मिळाले आणि त्याला यशदेखील आले.

खासदार सदाशिव लोखंडे हे तसे राजकीय नशीब घेऊन आलेले. मोदीलाट असताना ते 17 दिवसांत खासदार झाले. ते दोन टर्म खासदार राहिले. 2019 च्या लढाईत मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बळ त्यांना मिळाले. परिणामी विजय निश्चित झाला. खासदार लोखंडे यांच्या एकसष्टी कार्यक्रमात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी लोखंडे यांना हॅटट्रिकची संधी देऊ, असे म्हटले.

महायुतीत शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा नेमकी कोणाला जाते, हे पाहणे गरजेचे आहे. शिंदे गटाकडून या जागेवर दावा सांगितला असल्याने खासदार लोखंडे यांनी काही दिवसांपासून मतदारसंघात जोर-बैठका सुरू केल्या आहेत. दोन वर्षांपासून तसे मतदारसंघातील काम करताना दिसत आहेत.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Solapur Politics : ‘आंबेडकरांना महाआघाडीत घ्यावं; पण त्यांचं सर्वच ऐकलं...’ : सुशीलकुमारांचे मुद्यावर बोट

सुरुवीताला खासदार लोखंडे दिसत नाहीत, भेटत नाहीत, असे थेट आरोप झाले होते. राज्यातील राजकीय परिस्थितीच्या आकलनामुळे खासदार लोखंडे यांनी त्यांची राजकीय जबाबदारी अधिकच गांभीर्याने घेऊन मतदारसंघात दौरे आणि त्यातून कार्यक्रम वाढवले आहेत. हे करताना खासदार लोखंडे यांनी मतदारसंघातील प्रस्थापितांशी कधीही वाकडे घेतलेले नाही. त्यामुळे प्रस्थापितांकडूनदेखील त्यांना नेहमीच सहकार्य मिळाले आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) हा महायुतीत असताना शिवसेनेकडे होता. उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीत आहेत. शिवसेनेतील बंडानंतर खासदार सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे उबाठा गट महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी सुरू केली. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उबाठा गटात समावेश केला आहे. माजी खासदार वाकचौरे यांचा या मतदारसंघात जुना दांडगा जनसंपर्क आहे. तो आजही कायम आहे. उबाठा गटात प्रवेश करताच त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Ashok Chavan News: जनतेचा मोदींच्या नाही, तर काँग्रेसच्या गॅरंटीवर विश्वास; अशोक चव्हाणांचा दावा

खासदार लोखंडे हे एकसष्टी साजरी करीत असतानाच माजी खासदार वाकचौरे यांनी त्यांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम घेतला. यावेळी त्यांच्याबरोबर उबाठा गटाचे आणि काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. माजी खासदार वाकचौरे यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. जनसंपर्काबरोबर मतदारसंघातील महत्त्वाची आणि प्रलंबित कामांची यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणूक जशी जवळ येत आहे, तशी गणितंदेखील बदलत आहेत.

महाविकास आघाडी इंडियाकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीदेखील या लोकसभेची इच्छा व्यक्त केली आहे. तसे त्यांनी कार्यक्रमदेखील हाती घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी इंडियाकडून माजी खासदार वाकचौरे की, माजी आमदार कांबळे या प्रश्नाचे उत्तर येणारा काळ निश्चित करेल, हे मात्र नक्की.

लोखंडे आणि वाकचौरे यांच्या जमेच्या बाजू कोणत्या?

खासदार लोखंडे आणि माजी खासदार वाकचौरे यांनी मतदासंघात आपापल्यापरीने जनसंपर्कावर भर दिला आहे. खासदार लोखंडे यांनी निळवंडेचे काम आता मार्गी लागले असून, पुढची लढाई घाटमाथ्याचे पाणी अडवणे आहे, असे जाहीर केले आहे, तर लोखंडे यांनी केलेल्या विकासकामांची जंत्री तयार केली आहे. निवडणुकीला सामोरे जाताना ती लोकांपुढे मांडणार असल्याचे सांगत आहे.

तसेच मंत्री विखे आणि खासदार विखे यांची यंत्रणा माजी खासदार लोखंडे यांच्या जमेच्या बाजू असल्याचे आता तरी दिसते. माजी खासदार वाकचौरे यांचा मतदासंघात दांडगा संपर्क आहे. तसेच उबाठा गटाचे संघटन या मतदारसंघात जबरदस्त आहे. याचा नक्की फायदा होईल. सध्या महायुती भाजपविरोधात वातावरण या मतदारसंघात दिसते आहे. त्यामुळे काँग्रेसची सर्व यंत्रणा वाकचौरे यांच्या बाजूने उभी राहू शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com