Walmik Karad and Baban Gite .jpg Sarkarnama
मराठवाडा

Beed Jail Gang War Update : वाल्मिक कराड मारहाण प्रकरणात ट्विस्ट, महादेव गितेने सांगितलं काय घडलं? सीसीटिव्ही ठरणार मोठा पुरावा!

Mahadev Gite Walmik Karad : बीड कारागृह प्रशासनाकडून मारहाण वाल्मिक कराड आणि गिते गँगमध्ये झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांना कारागृह प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलवले होते.

Roshan More

Mahadev Gite News : बीडच्या जिल्हा कारागृहात 31 मार्चला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि गित्ते गँगचा महादेव यांच्यात मारहाण झाल्याची माहिती समोर आली होती. गिते गँगचा महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मात्र, पोलिसांनी वाल्मिक कराड आणि गीते गँगमध्ये मारहाण झाले नसल्याचे म्हटले होते. पण आता प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे.

वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच सुदर्शन घुले, प्रतिक घुले आणि त्यांच्या कारागृहातील इतर साथीदारांनी आम्हाला मारहाण केल्याची तक्रार महादेव गिते ,राजेश वाघमोडे यांनी कारागृह अधीक्षक यांच्याकडे केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाला असून तो तपासून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बीड कारागृह प्रशासनाकडून मारहाण वाल्मिक कराड आणि गिते गँगमध्ये झाली नसल्याचे म्हटले होते. मात्र, मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांना कारागृह प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलवले होते. त्यामुळे महादेव गितेला मारहाण झाली नाही तर त्यांना कारागृहात का हलवण्यात आले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे बीड कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हालवण्याच्या कारवाईबाबात ही कारवाई वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता. अक्षय आठवले गॅंगवरही कारवाई करत नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले.

कारागृह प्रशासनाचा नेमका दावा काय?

कारागृह प्रशासनाकडून कारागृहात झालेल्या मारहाणीबाबत सांगण्यात आले होते की, आरोपी 31 मार्चला सकाळी फोन करण्यासाठी बराकीतून बाहेर आले होते. त्यावेळी राजेश वाघमोडे, सुधीर सोनवणे यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी इतर कैदी देखील तेथे जमले. कारागृह प्रशासनाने वेळीच या कैद्यांना बाजूला करत वाद मिटवला. मात्र यावेळी वाल्मीक कराड, सुदर्शन घुले यांच्यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचा केला जाणारा दावा चुकीचा आणि खोटा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT