Dhairyasheel Mohite Patil: शहाजीबापूंनी भरसभेत थोबाडीत मारून घेतले, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी मीठ चोळले, म्हणाले, 'एक लाख 24 हजार...'

Dhairyasheel Patil VS Shahajibapu Patil : शहाजीबापू पहिल्यांदा आमदार झाले ते माळशिरसच्या 14 गावांमुळे आणि यांनी ज्या 14 गावांनी आमदार म्हणून पाठिंबा दिला त्याच गावांचे पाणी बंद करण्याचे काम केले, असा गंभीर आरोपही मोहिते पाटील यांनी केला.
 Dhairyasheel Patil
Dhairyasheel Patil sarkarnama
Published on
Updated on

Dhairyasheel Mohite Patil News : सांगोल्यातील मंत्री जयकुमार गोरे यांच्या सत्कार समारंभात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी ‘ज्यांनी पाणी अडवलं, त्यांना खासदार केलं आणि जो पाणी देणार आहे, तो घरात बसून आहे, असे म्हणत स्वतःच्या थोबाडीत दोन हाणून घेतल्या. शहाजीबापूंनी ज्या खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका करत स्वतःच्याच थोबाडीत हाणून घेतले त्या खासदार मोहिते पाटलांनी शहाजीबापूंची खिल्ली उठवली आहे.

'लोकांनी अभ्यास करून मतं टाकली आहेत. मी काठावर निवडून आलो नाही. एक लाख 24 हजारांनी निवडून आलोय. जर, या लोकांची कामं असती तर मी निवडून आलो असतो का? ते ज्येष्ठ आहेत त्यांची विषयी आदर आहे. माझ्याविषयी ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतील तर मी त्यांच्या पद्धतीने उत्तर देणार नाही. कामाच्या पद्धतीने उत्तर देऊ.', असे म्हणत शहाजीबापूंच्या पराभवाच्या जखमेवर खासदार धैर्यशील मोहित पाटील यांनी मीठ चोळले.

 Dhairyasheel Patil
Karnataka Rakshasa Vedike: महाराष्ट्राच्या कुरापती काढणाऱ्या कन्नडिगांचा चक्क मनसेला पाठिंबा; राज ठाकरेंच्या 'त्या' भूमिकेचं कौतुक

'शहाजीबापू पाटील यांना कायम प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. विधान परिषदेचे अनेक जागा रिकाम्या आहेत. वरिष्ठांनी संधी द्यावी. आपण सक्रिय असल्याचे दाखवण्याचे प्रयत्न ते करत आहेत. ', असाही टोला मोहिते पाटीलांनी लगावला.

सोलापूर जिल्ह्याला एक सुसंस्कृतपणा होता. विजयसिंह मोहित पाटीलसाहेब परिचारकसाहेब, गणपतआबा देशमुख असतील एकामेकांच्या तालुक्याचे पूरक राजकारण या लोकांनी केले. पुरक विकास केलाय. उजनी धरणातील पाणी उचलायचे ही योजना गणपत देशमुखांनी मंजुर केली होती. त्या योजनेचे पाणी त्यांनी (शहाजीबापू) स्वतःच्या गावी नेले, असे देखील मोहिते पाटील म्हणाले.

14 गावांचं पाणी पळवलं

विधानसभेच्या वेळी देखील यांनी सांगितेल की येवढा निधी आणला येवढी कामं केली. पण महाराष्ट्राचा निकाल वेगळा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल वेगळा आहे. यांनी शांत मनाने विचार केला पाहिजे. शहाजीबापू पहिल्यांदा आमदार झाले ते माळशिरसच्या 14 गावांमुळे आणि यांनी ज्या 14 गावांनी आमदार म्हणून पाठिंबा दिला त्याच गावांचे पाणी बंद करण्याचे काम केले, असा गंभीर आरोपही मोहिते पाटील यांनी केला.

 Dhairyasheel Patil
Nashik kidnapping News : नाशिकमध्ये खळबळ! भरदिवसा हॉटेल व्यावसायिकाचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com