Mahadev Jankar News  Sarkarnama
मराठवाडा

Mahadev Jankar News : जानकर यांचे दबावतंत्र यशस्वी, महायुतीकडून अखेर मनधरणी...

Lok Sabha Election 2024 : महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.

Prasad Shivaji Joshi

Parbhani News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे दबावतंत्र यशस्वी झाले असून आज रविवारी (दि. 24 मार्च) झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांकडून त्यांची मनधरणी करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपात जानकर यांना एक जागा देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जानकर यांनी परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघात तयारी केली आहे. त्याना कोणता मतदारसंघ देण्यात येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latets Marathi News)

दबावतंत्र यशस्वी -

महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीच्या जागावाटपात विश्वासात घेतले जात नसल्याचे लक्षात आल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात येत असलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात जानकर यांनी आक्रमक भूमिका मांडली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतरही महायुतीच्या नेत्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने जानकर यांनी महाविकास आघाडीचा पर्याय खुला ठेवला. तसेच शरद पवार यांचीही भेट घेतली होती. पवार यांनी जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघ देण्याची तयारीही दर्शवली होती. जानकर यांची महाविकास आघाडीसोबत जाण्याची पूर्ण तयारी झाली आहे, अशी चर्चा असतानाच, जानकर यांच्या उमेदवारीने भारतीय जनता पक्षाचा पारंपारिक मतदार असलेला 'ओबीसी मतदार' पक्षापासून दूर जाण्याची भीती असल्याने महायुतीमधील सूत्रे हलली.

अखेर आज रविवार, दि. 24 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जानकर यांची मनधरणी करण्यात आली आणि त्यांना एक जागा देण्याचे जाहीर करण्यात आले. महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याची पूर्ण तयारी केली होती.

मात्र जानकर यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. जानकर यांच्या परभणी येथील दौऱ्यात त्यांच्या या निर्णयाचे पडसादही उमटले होते. पक्षाच्या मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांनी ऑनलाईन बैठक घेत पक्षनेतृत्वाला आपल्या भावना कळवल्या होत्या.

परभणीमधून लढवणार निवडणूक ?

जानकर यांनी सुरुवातीपासून परभणी लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार रत्नाकर गुट्टे हे रासपमध्ये असल्याने त्यांनी परभणी लोकसभा (Lok Sabha) मतदारसंघावर दावा केला. तसेच जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते.

महाविकास आघाडीकडून जानकर यांच्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघ देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र जानकर (Mahadev Jankar) यांनी महायुतीमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीकडून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT