Mahadev Jankar News : जानकर - मोहिते पाटलांच्या दुसऱ्या भेटीनं माढा मतदारसंघात मोठा ट्विस्ट

Vijaysingh Mohite Patil : महादेव जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील माढ्यातून लोकसभेचे प्रबळ दावेदार मानले जातात. त्यासाठी दोघांनीही मोठी फिल्डिंग लावलेली आहे.
Mahadev Jankar Meet Vijaysingh Mohite Patil
Mahadev Jankar Meet Vijaysingh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Madha Political News : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी संपर्क मोहीमही सुरू केलेली आहे. त्यातूनच त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन चर्चा केली. माढा लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी पाहता मैदान मारण्यासाठी मोहिते पाटलांची साथ जानकरांना (Mahadev Jankar) मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

माढ्यात भाजपने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहित पाटील (Dhairyasheel Mohite Patil) लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपच्या माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम आहे. भाजपच्या या भूमिकेमुळे मोहिते पाटील कुटुंब नाराज झाल्याची चर्चा आहे. अशातच गुरुवारी (ता. 21) माढ्यातून इच्छुक असलेले महादेव जानकर यांनी पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांची अकलूज येथे भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mahadev Jankar Meet Vijaysingh Mohite Patil
Loksabha Election 2024 : कोल्हापूर-करवीर; चेतन नरकेंचे डावपेच वाढविणार महायुती अन् महाविकास आघाडीची डोकेदुखी...

भाजपने डावलल्याने इच्छुक धैर्यशील मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघात गावभेट दौरे व गाठीभेटी सुरू केल्या आहेत. तसेच ते बारामती येथे जाऊन ज्येष्ठ नेते शरद पवारांची (Sharad Pawar) शुक्रवारी (ता. २२) भेट घेणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, महाविकास आघाडीकडून महादेव जानकरांनाही पवारांनी ऑफर दिलेली आहे. यावर पुढील बोलणी झाली नसली तर आघाडीकडून जानकर हे माढा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. एकीकडे धैर्यशील मोहिते पाटलांनी हालचाली सुरू केल्या असल्या तरी दुसरीकडे महादेव जानकर यांनी विजयसिंह मोहिते पाटलांची भेट घेतली.

जानकर - मोहिते पाटलांच्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपने खासदार रणजीत नाईक निंबाळकरांना (Ranjit Naik Nimbalkar) पुन्हा रिंगणात उतरवल्याने मोहिते पाटलांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे. अद्याप त्यांनी पत्ता उघडा केला नसला तरी धैर्यशील मोहिते पाटलांनी मात्र प्रचारास सुरुवात केली आहे. त्यातच जानकरांनी मोहिते पाटलांची आता दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला असला तरी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला नाही. धैर्यशील हे पवारांची भेट घेणार असून, तत्पूर्वीच जानकरांनी मोहिते पाटलांचे घर गाठले. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती नसली तरी माढ्यातील आघाडीच्या उमेदवार ठरण्यापूर्वी झालेल्या भेटीला राजकीय वर्तुळात महत्त्व प्राप्त झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Mahadev Jankar Meet Vijaysingh Mohite Patil
Kolhapur Politics : लोकसभेतील एकी विधानसभेत ठरणार डोकेदुखी; कोल्हापूरच्या 6 मतदारसंघाचे 'असे' आहे राजकीय गणित

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com