Narendra Modi Sarkarnama
मराठवाडा

Narendra Modi : बाळासाहेब ठाकरेंची 'ती' इच्छा पूर्ण होताच काँग्रेसला दुःख; नरेंद्र मोदींचा 'मविआ'वर घणाघात

PM Narendra Modi Criticized Maha Vikas Aghadi: छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या इच्छेची आठवण करून दिली.

Pradeep Pendhare

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालताना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची पूर्ण केलेल्या इच्छेची आठवण करून दिली.

"औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नाव करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरेंची होती, ती पूर्ण केल्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ही इच्छा पूर्ण करताच, सर्वात जास्त दुःख काँग्रेसला झाले", असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची सभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुती प्रमुख नेते या सभेला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरवातीला हिंदुत्वाच्या मुद्याला हात घालत हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची छत्रपती संभाजीनगर नावाशी निगडीत असलेली आठवण सांगून सभेत उत्साह भरला.

नरेंद्र मोदी म्हणाले, "छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्याची मागणी कोणी केली होती, याची आठवण करून देत हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आठवण सांगितली. काँग्रेसच्या काळात हे नाव बदलण्याची हिंमत कोणीही केली नाही. परंतु महायुती सरकार येताच छत्रपती संभाजीनगर हे नाव केले. आम्ही तुमची इच्छा पूर्ण केली. बाळासाहेब ठाकरेंची इच्छा पूर्ण केली".

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या सरकारला देखील शुभेच्छा देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर होण्याची सर्वात जास्त दुःख काँग्रेसला झाले होते. महाविकास आघाडीला दुःख झाले. हा निर्णय बदलण्यासाठी न्यायालयापर्यंत गेले होते. संभाजी महाराजांच्या नावावर आपत्ती आहे, त्यांना त्यांच्या हत्यारामध्ये मसीहा दिसतो, हे लोक महाराष्ट्र आणि मराठी स्वाभिमानाच्या विरोधात उभे आहेत', असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान मोदी यांनी हे लोक आपल्या ओळखीविरोधात आहे. महाराष्ट्र अशा लोकांचा स्वीकार करणार नाही. महाराष्ट्राला विकसित भारताचे नेतृत्व करायचे आहे, असे सांगून छत्रपती संभाजीनगरचे यात मोठे योगदान राहणार आहे. महायुतीमुळे पायाभूत सुविधा वाढल्या. समृद्धी महामार्ग संभाजीनगरहून जातो आहे. मराठवाडा विदर्भ आणि मुंबईला जोडला गेला आहे. रेल्वेला आधुनिक बनवले जात आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT