CM Siddaramaiah : कर्नाटक सरकार धोक्यात? भाजपकडून काँग्रेस आमदारांना 50-50 कोटींची ऑफर'; CM सिद्धरामय्यांचा मोठा आरोप

BJP Offered Rs 50 crore Congress MLA in Karnataka: कर्नाटकमध्ये भाजपकडून राजकीय घडामोडी सुरू असून, काँग्रेस सरकार पाडण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काँग्रेस नेते CM सिद्धरामय्यांनी केला.
CM Siddaramaiah
CM SiddaramaiahSarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत व्यग्र असलेली भाजप देशातील राजकारणात 24 तास अ‍ॅटिव्ह मोडवर असते. याचाच प्रत्यय काँग्रेस नेते तथा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपानंतर देखील येतो.

"भाजप कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असून, काँग्रेसच्या 50 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची ऑफर दिली. पण काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही म्हणून आता त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहे", असा गंभीर आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते टी नरसीपुरा इथं 470 कोटी रुपयांच्या विकासकामांच्या उद्घाटनानंतर हा गंभीर आरोप केला. माझे सरकार उलथून टाकण्यासाठी त्यांनी (भाजप) काँग्रेसच्या 50 आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांची ऑफर दिली. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले? माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, विरोधी पक्षनेते आर अशोक, भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी पैसे छापले का? असा प्रश्न देखील सिद्धरामय्या यांनी केला.

CM Siddaramaiah
Mohammad Adeeb : ' सरकारने मुस्लिमांचे उपकार मानले पाहिजेत, नाहीतर पाकिस्तान लखनऊपर्यंत असता' ; माजी खासदाराचं वक्तव्य!

काँग्रेसच्या (Congress) आमदारांना ऑफर देण्यासाठी वापरण्यात येणारे पैसे सर्व लाचेच असल्याचा सिद्धरामय्या यांनी केला. तसेच त्यांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. हे पैसे वापरून त्यांनी प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देण्याची ऑफर दिली. पण, यावेळी आमच्या एकाही आमदार फुटला नाही. आता या आमदारांना वेठीस धरण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू केली आहे.

CM Siddaramaiah
Chirag Paswan : राजकीय फेरा, चिराग पासवान यांच्या काकांना 40 वर्षे जुनं घर कराव लागलं खाली

दरम्यान, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या स्नेहमोयी कृष्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी काँग्रेसच्या एका नेत्याने तक्रार दाखल केली आहे. स्नेहमोयी कृष्णा यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात खोटी माहिती पसरवल्याचा आरोप आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते लक्ष्मण एम. यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यासाठी कृष्णा यांनी म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या घोटाळ्याबाबत त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये खोटी विधाने केली आहेत, असा आरोप आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com