Rohit Pawar : आम्हाला दुर्दैवाने राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणावे लागते; रोहित पवार यांचा टोला

Rohit Pawar Calls Raj Thackeray Contract Man: राज ठाकरे यांचे कोणाला काही समजत नाही. ते वेळोवेळी भूमिका बदलतात. त्यामुळे राज ठाकरे यांची उंची कमी होत चालली आहे. भाजपची उंची ती कमी करीत आहेत.
Rohit Pawar, Raj Thackeray
Rohit Pawar, Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राज ठाकरे यांच्या मनसने राज्यात सर्वच मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. नंतर त्यात कपात केली. अनेकांना उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माघार घ्यायला लावली. या घडामोडी बघता मनसेला भाजपने मते खाण्याची सुपारी दिली असावी, अशी शंका शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे कोणाला काही समजत नाही. ते वेळोवेळी भूमिका बदलतात. त्यामुळे राज ठाकरे यांची उंची कमी होत चालली आहे. भाजपची उंची ती कमी करीत आहेत. त्यामुळे दुदैवाने आम्हाला त्यांच्याबाबत बोलावे लागत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत मतांचे विभाजन करून त्यांना भाजपला मदत करायची आहे, असे त्यांच्या धोरणावरून दिसते.

Rohit Pawar, Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरे 'या' पक्षासोबत कंम्फर्टेबल, स्वतःच सांगितलं कारण

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही ते टीका करीत आहेत. मात्र, त्यांना मला एवढेच सांगायचे आहे, शरद पवार यांनी कधीही कुटुंब आणि पक्ष फोडला नाही. या उलट हे काम देवेंद्र फडणीस यांनी केले. राज ठाकरे यांनी स्वतंत्र पक्ष काढला. ही चांगली गोष्ट आहे. त्यांची पूर्वीची आणि आत्ताची भाषण ऐकली तर ते इतक्या पटापट भूमिका बदलत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकांना काही कळेनासे झाले आहे, ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत.

Rohit Pawar, Raj Thackeray
Pramod Sawant : चंदगडमध्ये गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीत टाकली वादाची ठिणगी; थेट उमेदवार केला जाहीर

अजितदादा यांना पवार साहेबांनी सर्व काही दिले होते. त्यानंतरही ते भाजपच्या नादी लागले. कुटुंब सोडले. आता सहानुभूतीसाठी ते वेगवेगळे वक्तव्य करीत आहे. मात्र, त्याला काही अर्थ नाही. मात्र ते लोकांची दिशाभूल करीत आहेत, एवढे नक्की असेही रोहित पवार म्हणाले.शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरल्याशिवाय मतदान मिळत नाही. महाराष्ट्रातील सामान्य व्यक्ती हेच बोलत होता. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अजितदादांना नाव व फोटो वापरण्यास मनाई केली आहे.

Rohit Pawar, Raj Thackeray
Bhokar Assembly Election : भोकरकरांच्या सेवेसाठी राजकारणात पाऊल : श्रीजया चव्हाण

अजित पवार यांनी बाहेर पडण्यापूर्वीच याचा विचार करायला पाहिजे होता. पैसा असेल तेव्हा पक्ष फोडायला अक्कल लागत नाही. मात्र, पक्ष बांधयाला, वाढवायाला आणि माणसे जपायला अक्कल लागते, असे सांगून नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. दिलीप वळसे पाटील यांना पवार साहेबांचा मानसपुत्र समजायचे. त्यांना खूप संधी दिली, पदे दिली. मात्र कारवाईच्या भीतीने ते भाजपबरोबर गेले. गेले तर गेले त्यांच्या मित्राच्या कंपनीला सरकारतर्फे मोठे टेंडर देण्यात आले. शंभर दोनशे कोटींचा मलिदा देण्यात आला. ते म्हणतात विकासासाठी गेले यावरून ते कोणाच्या विकासासाठी गेले सिद्ध होते असेही रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar, Raj Thackeray
Kannad Assembly Election : घराणेशाही, गुत्तेदारी, संपुष्टात आणण्यासाठी शेतकरी संघटनेत प्रवेश : मनोज पवार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com