Ambadas Danve at a public event after Maharashtra government withdrew his Y Plus escort security cover. Sarkarnama
मराठवाडा

Gas Cylindar News : गॅसचा काळाबाजार, दोन-तीन हजाराला सिलेंडर विकताना अंबादास दानवेंनीच धाड टाकली!

Maharashtra politics News : आखाती देशातील यु्द्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. गॅसची साठेबाजी, काळ्या बाजारात सर्रास विक्री सुरू असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : आखाती देशातील यु्द्धाच्या झळा सर्वसामान्यांना बसू लागल्या आहेत. गॅसची साठेबाजी, काळ्या बाजारात सर्रास विक्री सुरू असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. याच मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज आंदोलन छेडले. इकडे शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडरच्या काळाबाजार विक्री विरोधात आंदोलन सुरू असताना एका भागात दोन-तीन हजारांना घरगुती सिलेंडरची विक्री काही दलालांकडून सुरू असल्याची माहिती मिळाली.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मग आपला मोर्चा त्या भागात वळवला तर तिथे गॅस एजन्सीच्या गाडीतून घरगुती सिलेंडरची विक्री जादा दराने सुरू असल्याचे निदर्शनास आले. दानवे यांनी तात्काळ पुरवठा अधिकाऱ्यांना फोन लावून याचा जाब विचारला, उपस्थित पोलीसांना संबंधित गॅस एजन्सी, काळ्या बाजारात सिलेंडर विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस गुन्हा दाखल करणार नसतील तर आम्ही या हरामखोरांना धडा शिकवू, अशी आक्रमक भूमिका घेतली.

हर्सूल टी पॉइंट भागात आंदोलन सुरू असताना सुरू असलेला गॅसचा काळाबाजार शिवसैनिकांनी उघडकीस आणला. एजन्सीची गाडी एका गल्लीत जादा दराने गॅस सिलेंडर विकताना पकडण्यात आली. अंबादास दानवे यांनी घटनास्थळी दाखल होत जिल्हा पुरवठा प्रशासनाला जाब विचारत संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

'असा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, प्रशासन झोपले आहे का? तात्काळ स्पॉटवर या, तुम्ही यात इन्व्हाॅल आहात का'? असा थेट सवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला केला. संबंधितांवर आताच कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने धडा शिकवू, असा इशारा त्यांनी दिला. त्यानंतर शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून संबंधितांवर गुन्हा दाखल करून घेतला.

छत्रपती संभाजीनगर शहरात घरगुती गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच गॅसचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याने सर्वसामान्य जनतेची लूट होत आहे. या गंभीर प्रश्नाकडे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे लक्ष शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वेधले. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. गॅस टंचाई तात्काळ दूर करावी, काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT