LPG Supply Nagpur: नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा गॅस तुटवड्याबाबतचा दावा खरा की खोटा? VSA क्लबचं किचन बंद,गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा

Nagpur Gas Cylinder Shortage : नागपुरात सिलिंडर टंचाई नसल्याचा जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांचा दावा असला तरी व्यावसायिक सिलिंडर अभावी व्हीसीए क्लबचे किचन बंद झाले असून गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
Customers standing in long queues outside gas agencies in Nagpur amid reports of LPG cylinder shortage, while authorities claim the supply situation is under control.
Customers standing in long queues outside gas agencies in Nagpur amid reports of LPG cylinder shortage, while authorities claim the supply situation is under control.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या झळा भारतीय बाजारपेठेला बसू लागल्या असून देशाच्या अनेक भागांत सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. चहाच्या टपऱ्यांपासून मोठ्या हॉटेलपर्यंत सर्वांचीच गॅस अभावी कोंडी झाली असताना, नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी मात्र जिल्ह्यात सिलिंडरची कोणतीही टंचाई नसल्याचा दावा केला आहे. शहरात एकही हॉटेल बंद पडलेले नाही आणि सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी म्हटले असले तरी, प्रत्यक्षात मात्र व्यावसायिक सिलिंडर उपलब्ध नसल्याने व्हीसीए क्लबसारख्या मोठ्या ठिकाणचे किचन बंद करण्याची वेळ आली आहे.

जिल्हाधिकारी इटनकर यांनी आज परिस्थितीचा आढावा घेतल्यावर सांगितले की, सिलिंडर टंचाईच्या चर्चा केवळ अफवा असून नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण केली जात आहे. "माझ्याकडे एकानेही सिलिंडर मिळत नसल्याची तक्रार केलेली नाही. हॉटेल व्यावसायिकांकडे चार ते पाच दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे. भविष्यातील धोका आणि युद्धाची परिस्थिती लक्षात घेऊन केवळ खबरदारी म्हणून सिलिंडरचे रेशनिंग केले जात आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

या रेशनिंगनुसार, एकदा सिलिंडर घेतल्यावर पुढील 25 दिवस दुसरे बुकिंग घेता येणार नाही, जेणेकरून काळाबाजार रोखता येईल आणि घरगुती ग्राहकांना वेळेत पुरवठा होईल, असेही त्यांनी नमूद केले. घरगुती ग्राहकांनी तातडीने 'केवायसी' अपडेट करावे, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Customers standing in long queues outside gas agencies in Nagpur amid reports of LPG cylinder shortage, while authorities claim the supply situation is under control.
Land scam : शिवसेना आमदाराने महसूल मंत्र्यांसमोरच उघड केलं तहसिलदाराचं 'कांड' : अवैध ठरवलेल्या जमिनीसाठी 160 कोटी मंजूर

एककीकडे जिल्हाधिकारी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे शहरातील चित्र मात्र अत्यंत गंभीर दिसत आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्याने अनेक व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. व्हीसीए क्लबसारख्या प्रतिष्ठित ठिकाणचे किचन बंद झाल्याने प्रशासनाचा दावा फोल ठरत असल्याची चर्चा आहे.

Customers standing in long queues outside gas agencies in Nagpur amid reports of LPG cylinder shortage, while authorities claim the supply situation is under control.
Nagpur Mahapalika News: भाजपचा नागपूर महापालिकेत धाडसी निर्णय, स्थायीसह सर्वच्या सर्व समित्यांवर असणार 'महिलाराज'

गॅस एजन्सींच्या बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, एजन्सींकडून फोनही उचलले जात नसल्याने नागरिकांचा संताप अनावर होत आहे.प्रशासनाचे 'रेशनिंग' आणि 'काळाबाजारावर नियंत्रण' हे शब्द कागदावरच मर्यादित असून सर्वसामान्यांना मात्र गॅससाठी वणवण करावी लागत आहे, हेच वास्तव नागपुरात (Nagpur) सध्या पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com