Ambadas Danve Sandipan Bhumre sarkarnama
मराठवाडा

Ambadas Danve : 'संदिपान भुमरे आता मंत्री नाहीत, त्यांना घाबरण्याची गरज नाही', अंबादास दानवेंनी अधिकाऱ्यांना ठणकावले

Jagdish Pansare

Ambadas Danve News : 'आतापर्यंत झाले ते झाले. यापुढे संदिपान भुमरे आणि त्यांच्या सुपुत्राला घाबरण्याची अजिबात गरज नाही.भुमरे आता आमदार नाहीत. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता त्यांना कोणताही जनता दरबार घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. सभापती, उपसभापती च्या दालनाला कुलूप लावा. जर कोणी जनता दरबार घेतला तर मला सांगा मी बघतो काय करायचे ते? अशा शब्दात शिवसेना नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पैठण मधील शासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जिल्ह्यातील शिवसेनेच्या 'शिवसंकल्प' बैठकांची सुरुवात अंबादास दानवे यांनी पैठण तालुक्यापासून केली. आडुळ आणि पाचोड येथे जिल्हा परिषद सदस्यांची व तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संदिपान भुमरे व त्यांचे सुपुत्र विलास भुमरे यांच्या दबावात तालुक्यातील सगळे प्रशासकीय अधिकारी काम करत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या.

संतापलेल्या अंबादास दानवे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दम देत भुमरे पिता पुत्रांच्या दबावाला अजिबात बळी पडू नका, त्यांना घाबरण्याची गरज नाही. संदिपान भुमरे Sandipan Bhumre आता आमदार नाहीत. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते खासदार झाल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे पैठण तालुक्यात जनता दरबार घेण्याचा अधिकार राहिलेला नाही.

जर कुणी जोर जबरदस्तीने सभापती, उपसभापतीच्या दालनात बसून कारभार करत असेल तर त्याला कुलूप ठोका. पदावर नसताना आणि कोणताही अधिकार नसताना जर भुमरे किंवा त्यांचे सुपुत्र अधिकाऱ्यांना धमकावत असतील, जनता दरबार भरवत असतील तर त्याचे व्हिडिओ शूटिंग करून मला पाठवा. मग मी बघतो त्याचे काय करायचे,असा इशाराही अंबादास दानवे Ambadas Danve यांनी यावेळी दिला.

अधिकाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याण काळे हे आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघ हा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो.शिवाय संदिपान भुमरे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले असल्यामुळे ते आता आमदार किंवा राज्याचे मंत्री राहिलेले नाहीत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आतापर्यंत जे घडले ते घडले. यापुढे मात्र त्यांनी जनता दरबार भरवण्याचा आग्रह केला तर अधिकाऱ्यांनी त्यांना विरोध केला पाहिजे.

यापुढे जर भुमरे पिता-पुत्रांच्या दबावाला बळी पडून अधिकाऱ्यांनी जनता दरबार किंवा इतर बैठका घेतल्या तर ते त्यांच्याही अंगलट येईल,असा इशाराही दानवे यांनी यावेळी बैठकीत दिला. एकूणच जिल्ह्यातील शिवसंकल्प बैठकीच्या निमित्ताने संदिपान भुमरे यांच्या विरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT