Congress Cross Voting : संदीप गुळवेंचा इशारा, आम्हाला विश्वासात घेऊन खोसकरांबाबत निर्णय घ्या!

Congress MLA Hiraman Khoskars : 'क्रॉस व्होटिंग'च्या कारवाईमुळे इगतपुरी मतदार संघात मोठा राजकीय पेच निर्माण होणार आहे. त्यातून मतदार संघातील राजकीय परिस्थितीत अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Hiraman Khoskar- Sandeep Gulve
Hiraman Khoskar- Sandeep GulveSarakarnama
Published on
Updated on

Hiraman Khoskar News : विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी 'क्रॉस व्होटिंग' केले. हा विषय काँग्रेस नेत्यांनी आता गांभीर्याने घेतला आहे. यामध्ये आमदार हिरामण खोसकर यांचे नाव घेतले जात आहे. काँग्रेस नेते वेणूगोपाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी क्रॉस व्होटिंग संदर्भात चर्चा होणार आहे. यामध्ये आमदार हिरामण खोसकर यांना देखील बोलविण्यात आले आहे.

क्रॉस व्होटिंग विषयावर आमदार खोसकर यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे आमदार खोसकर यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास इगतपुरी मतदारसंघात मोठा राजकीय पेच निर्माण होणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यातून मतदार संघातील राजकीय परिस्थितीत अनेक फेरबदल होण्याची शक्यता आहे.

या परिस्थितीत या मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसू शकतो. 2019 मध्ये शिवसेनेच्या आमदार निर्मला गावित आणि काँग्रेसचे खोसकर यांच्यात लढत झाली होती. त्यात खोसकर विजयी झाले.सध्या निर्मला गावित शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत.

Hiraman Khoskar- Sandeep Gulve
Digvijay Singh:...आता आमदारांचीही होतेय विक्री; दिग्विजय सिंग यांचा गद्दारांवर घणाघात

इगतपुरी मतदारसंघावर गावित यांची पकड आहे.आदिवासी महिला नेत्या म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अशा स्थितीत निर्मला गावित या प्रबळ उमेदवार म्हणून पुढे येऊ शकतात. शिवसेना ठाकरे गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. महाविकास आघाडीच्या धोरणानुसार शिवसेनेला ही जागा न मिळाल्यास काँग्रेस कडून निर्मला गावित उमेदवार होऊ शकतील.अशीही एक राजकीय शक्यता आहे.

त्यामुळे आमदार खोसकर यांच्याबाबत काय निर्णय होतो, याची मोठी उत्सुकता आहे. इगतपुरी तालुक्यावर काँग्रेसच्या विचारसरणीचा मोठा पगडा आहे. (कै) गोपाळराव गुळवे यांना माणनारा मतदार येथे आहे.

असे असले तरी तळागाळात पक्षाचे फारसे सक्रिय पदाधिकारी नाहीत. संदीप गुळवे हे मोठे नेते शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षात गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर गुळवे यांनी अतिशय सूचक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खोसकर हे सामान्य कार्यकर्त्यातून आमदार झाले आहेत. विरोधी पक्षात असल्याने मतदार संघाच्या विकासासाठी ते सर्व पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाचे नेते काहीही विधाने करून दडपण आणू शकतात.

Hiraman Khoskar- Sandeep Gulve
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या 'लाडक्या' योजनांवर शिक्षकांचा संताप, 'आम्ही वेतनवंचित अन् बेरोजगारांना खिरापत!

खोसकर यांच्यावर कारवाई करताना सहकारी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊनच काँग्रेसने (Congress) निर्णय घ्यावा. इगतपुरी मतदार संघ काँग्रेसची मक्तेदारी राहिलेली नाही. महाविकास आघाडी म्हणून आमच्या मताला महत्त्व न दिल्यास खोसकर यांच्या कारवाईने विरोधकांना फायदा होऊ शकतो.

या स्थितीत शुक्रवारी होणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आमदार खोसकर यांनीही आपल्या समर्थकांची चर्चा करून पुढची तयारी सुरू केली आहे. या सगळ्यांमध्ये काँग्रेसच्या निर्णयाने महायुतीला बळ मिळेल की काय? अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com