Beed Crime .jpg Sarkarnama
मराठवाडा

Beed Crime News: बीडमधील संतापजनक घटना; पत्नी हात जोडून विनवणी करत असतानाही चार-पाच जणांनी ऊसतोड कामगाराला मार मारलं...नेमकं काय घडलं..?

Beed Crime Viral Video: काही दिवसांपूर्वीच बीड शहरातील बस स्थानक परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा बीडमधील निर्दयी गुन्हेगारीचं वास्तव दाखवणारी घटना समोर आली आहे.

Deepak Kulkarni

Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येनं बीड जिल्ह्यास संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्येनंतर बीडमधील गुन्हेगारीचं काळं रुप समोर आलं होतं. मात्र, यानंतरही बीडमध्ये हाणामारी,खून,अत्याचार,गोळीबार यांसह गुन्हेगारी अधिकाधिक फोफावतच चालल्याचं अनेक हादरवणाऱ्या घटनांमधून समोर येत आहे. अशातच आता पुन्हा एकदा बीडमधील निर्दयी गुन्हेगारीचं वास्तव दाखवणारी घटना समोर आली आहे.

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराच्या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ऊसतोड कामगाराची पत्नी आरोपींसमोर पतीला मारु नका,अशी विनवणी करत असतानाही चार पाच जणांच्या टोळक्याकडून लाथा-बुक्या काठीनं बेदम करताना दिसून येत आहे.या घटनेमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

धारूर तालुक्यात असलेल्या खारेवाडी परिसरात ही मारहाणीची घटना घडल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी सिरसाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये गब्बू खाडे, श्रीकांत खाडे, अजय वसंत खाडे यांचा समावेश आहे.

या घटनेत मारहाण झालेल्या ऊसतोड कामगाराचं नाव गणेश बाळासाहेब वाघ असं आहे. गणेश यांना ऊसाच्या वाढ्यात कांडी का ठेवली असा जाब विचारत त्यांच्या पत्नी समोरच आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यावेळी ऊसतोड कामगाराची पत्नी आरोपींना मारू नका अशी विनवणी करत होती. पण ते तिचं काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपल्यासमोर पतीला मारहाण होताना ती शांतपणे पाहत राहिली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हा सर्व मारहाणीचा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्या ऊसतोड कामगाराच्या मानेवर पाय देत मारहाण करण्यात येत होती. पण आरोपींपैकी एकाच्या कुणातरी या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ काढत असल्याचं लक्षात आल्यावर त्याने मोबाईल ताब्यात घेऊन तो फोडण्यास सांगितलं. पण तरीही मारहाण सुरूच ठेवली होती.

धारूर तालुक्यामधील खारेवाडी परिसरात घडलेल्या मारहाणीच्या घटनेत ऊसतोड कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली आहे. पण धक्कादायक घटनेमुळे ऊसतोड कामगाराचं संपूर्ण कुटुंब प्रचंड घाबरलेलं आहे.

सिरसाळा पोलिसांत दाखल केलेल्या फिर्यादीत गणेश वाघ यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या पत्नी आणि भावालाही मारहाण झाल्याचा उल्लेख करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा सुरू झाली आहे.

बसस्टँडजवळ दगडाने ठेचून हत्या

काही दिवसांपूर्वीच बीड शहरातील बस स्थानक परिसरात एका तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. गांधीनगर भागात राहणारा नौशाद नावाचा तरुण बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या एका पत्र्याच्या जवळ मृत अवस्थेत आढळून आला होता. डोक्यावर दगडाने वार करून नौशादची हत्या करण्यात आली,असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता.

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी तो जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. नौशाद हा काल रात्री उशिरापर्यंत आपल्या दोन मित्रांसोबत बस स्थानक परिसरात बसून नशा करत होता, असं बोललं जात आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या दोन्ही मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT