

New Delhi News: ईशान्य भारतातील मणिपूरमध्ये 2023 पासून पेटलेला वांशिक हिंसाचारानंतर आता कुठेतरी तिथे परिस्थिती सुधारत आहे. याचदरम्यान,मणिपूरनंतर मेघालयमध्ये हिंसाचार उफाळून आला आहे. मेघालयमध्ये हिंसाचार पेटल्यानंतर बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स क्षेत्रात समाजकंटकांनी BSF जवानांवर हल्ला चढवला. यात अनेक जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) डीआयजीच्या ताफ्यातील एका वाहनही पेटवून दिले आहे.
मेघालयमधील गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीवरुन विरोध प्रदर्शन सुरु झाल्यानंतर हा हिंसाचार उफाळून आल्याचं समोर येत आहे. आंदोलक निवडणुकीत बिगर गारो समुदायाच्या नामांकन प्रक्रियेच्या सहभागाला विरोध दर्शवत होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला, तसेच अनेक नागरीक गंभीर जखमी झाले आहेत.
आदिवासी आणि बिगर आदिवासी गटांमध्ये चिबिनांग भागात वादाचा भडका उडाला. यानंतर त्याठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण झाली. जिल्हा प्रशासनानं या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तात्काळ कठोर पावले उचलताना जिल्ह्यात जमावबंदी (Curfew) लागू केली. तसेच चिबिनांग मोठा फौजफाट तैनात करण्यात आला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे भारत-बांग्लादेश सीमेजवळ असलेल्या पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यातील गावात बैठक आटोपून डीआयजी अन्य अधिकारी परतत होते. याचवेळी संतापलेल्या जमावाकडून डीआयजी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात डिआयजी व अधिकारी किरकोळ जखमी झाले. या ताफ्यातील एका वाहन जमावानं पेटवून दिलं.
गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषद निवडणुकीवरुन हिंसाचार उफाळल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर सैन्यालाही पाचारण करण्यात आले. संरक्षण प्रवक्ते महेंद्र रावत यांनी सांगितले की, जनतेचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्ह्यात लष्कराचे जवान ध्वज मार्च काढत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.