Mohite Patil VS BJP : मोहिते पाटलांची मोठी खेळी : दोन सदस्यांच्या शिंदेसेनेला सभापतिपद, पालकमंत्र्यांना शह देण्याचा डाव

Malshiras Panchayat Samiti Sabhapati : माळशिरस पंचायत समितीत राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही मोहिते पाटलांनी शिंदेसेनेला सभापतिपद दिले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात प्रथमच शिंदेसेनेचा सभापती निवडून आल्याने राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे.
Malshiras Panchayat Samiti Sabhapati
Malshiras Panchayat Samiti SabhapatiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 12 March : माळशिरस पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सभापतिपद दिले आहे. भारतीय जनता पक्षाची विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे आणि त्यांच्या चमूची विरोधातील चाल ओळखून मोहिते पाटलांनी नवा डाव टाकत शिंदेसेनेच्या जवळ जाण्याची खेळी केली आहे. शिंदेसेनेतील आपल्याच निष्ठावंताच्या गळ्यात मोहिते पाटलांनी सभापतिपदाची माळ घातली आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रथमच शिंदेसेनचा सभापती प्रथमच निवडून आला आहे.

माळशिरस पंचायत समितीच्या (Malshiras Panchayat Samiti) १८ जागा भाजपने स्वतंत्रपणे लढवल्या होत्या, तर मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेनेना यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. त्यात भाजपला सहा, तर मोहिते पाटील आणि जानकर यांच्या आघाडीला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यात शिंदेसेनेला २, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे बहुमत हे मोहिते पाटलांकडे होते.

सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP SP) वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, शिवसेनेकडून दत्तात्रय मगर आणि भाजपकडून ऋतुजा पराडे पाटील यांनी अर्ज भरले होते. मात्र, वैष्णवीदेवी मोहिते-पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने दत्तात्रेय मगर आणि ऋतुजा पराडे पाटील यांच्यात थेट लढत झाली. त्यात दत्तात्रेय मगर यांना १२, तर ऋतुजा पराडे पाटील यांना ६ मते मिळाली. त्यामुळे मगर यांची सभापतिपदी निवड जाहीर करण्यात आली.

उपसभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मनीषा पाटील आणि भाजपकडून आनंद शेंडगे यांच्यात लढत झाली. मतदानात मनीषा पाटील यांना १२ तर आनंद शेंडगे यांना ६ मते मिळाल्याने पाटील यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

Malshiras Panchayat Samiti Sabhapati
Sabhapati Election : गोरेंच्या रणनीतीने सोलापुरातून राष्ट्रवादी हद्दपार : 10 पंचायत समित्यांवर भाजपचा झेंडा, शिंदेसेनेला एका ठिकाणी यश

मोहिते पाटील यांच्याकडे बहुमत असूनही त्यांनी शिंदेसेनेला सभापतिपद दिल्याने सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सभापती झालेले दत्तात्रेय मगर हे मूळचे मोहिते पाटील समर्थक कार्यकर्ते आहेत, त्यांनी शिंदेसेनेतून निवडणूक लढवली, त्यामुळे मोहिते पाटील यांनी शिंदेसेनेतील आपल्याच समर्थकाच्या हाती सभापतिपद सोपवले आहे.

दरम्यान, मगर यांचे चुलते नानासाहेब मगर हे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे अनेक वर्षे संचालक आणि उपाध्यक्ष होते. तसेच मगर यांचे वडील विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते होते. विजयदादा आणि माजी राज्यमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते, त्यामुळे शिंदेसेनेतील आपल्याच कार्यकर्त्याच्या हाती पंचायत समितीची सत्ता असणार आहे.

Malshiras Panchayat Samiti Sabhapati
North Solapur Sabhapati : उत्तर सोलापूरचे सभापतिपद भाजपचे शहाजी पवार गटाकडे; तर उपसभापतिपद यशवंत माने गटाकडे

शिंदेसेनेचा सभापती निवडून मोहिते पाटील यांनी भाजप आणि पालकमंत्र्यांच्या रणनीतीला उत्तर दिल्याचे मानले जात आहे. शिंदे सेनेच्या माध्यमातून मोहिते पाटील यांनी निधीचा प्रश्न सोडविल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com