लातूरमध्ये माजी मंत्री विनायक पाटील यांनी स्वबळावर लढण्याचे वक्तव्य करून महाविकास आघाडीत खळबळ माजवली आहे.
पाटीलांच्या वक्तव्यामुळे लातूरसह मराठवाड्यात आघाडीतील मतभेद उघडकीस आल्याची चर्चा रंगली आहे.
आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वक्तव्याचे राजकीय परिणाम महत्त्वाचे ठरणार आहेत.
Latur Local Body Election 2025 : लातूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सन्मानाने जागा दिल्या तर सोबत लढू अन्यथा स्वबळावर या निवडणुका लढवल्या जातील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री विनायक पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कमी दिवस राहिले आहेत. अशा वेळी माझ्यावर ही जबाबदारी आली आहे. लोकांपर्यंत जावे लागणार आहे. सध्या राज्य व देशातील राजकीय परिस्थिती बदलत चालली आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनमत तयार होत आहे. अशा वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विचार लोकापर्यंत आम्हाला पोचवावे लागतील, असे पाटील म्हणाले.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. अशा वेळी राज्य शासनाने शब्द पाळलेला नाही. भूलथापा, बनवाबनवी ते करीत आहेत. हे आता जनतेलाही कळाले आहे. अशा परिस्थितीत आमच्या पक्षाशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे उद्यापासून लातूर जिल्ह्यात दौरे करण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावे असे आदेश पक्षाचे आहेत.
आमची जेथे ताकद आहे, त्या जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत. जेथे ताकद नाही तेथे आम्ही उमेदवारी घेणार नाही. कोणी तरी बसले आणि आघाडी झाली असे होणार नाही. मानसन्मान मिळालाच पाहिजे. अन्यथा आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवू असे पाटील म्हणाले.
कार्यकर्त्यांची ही निवडणूक आहे. त्यामुळे आम्हाला सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला धडा शिकवण्याची ही वेळ आली आहे. येत्या काही दिवसांत वातावरण कसे होते ते सर्वांनाच लक्षात येईल, असे पाटील म्हणाले. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, संभाजी पाटील, राजा मणियार, प्रशांत घार आदी उपस्थित होते.
विनायक पाटील यांच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. लातूर जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुती अजून झालेली नाही. तर महाविकास आघाडीमध्येही जागा वाटपावरून धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे. युती-आघाडीचे निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्याची ताकद अधिक त्याला जास्त जागा असे धोरण आहे. त्यानूसारच वाटप केले जावे, असा आग्रह नेते धरताना दिसत आहेत. विनायक पाटील यांच्या इशाऱ्यानंतर आघाडीतील शिवसेना, काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
1. विनायक पाटील कोण आहेत?
→ विनायक पाटील हे लातूरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आहेत, ज्यांचा मराठवाड्यात मोठा प्रभाव आहे.
2. त्यांनी नेमके काय वक्तव्य केले?
→ त्यांनी "आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत" असे सांगून महाविकास आघाडीत खळबळ उडवली.
3. या वक्तव्याचा आघाडीवर काय परिणाम होईल?
→ या वक्तव्यामुळे आघाडीत तणाव वाढू शकतो आणि स्थानिक निवडणुकांमध्ये स्वतंत्र लढाईचे संकेत मिळू शकतात.
4. लातूरमध्ये सध्या राजकीय समीकरणे कशी आहेत?
→ लातूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी असली तरी अंतर्गत मतभेद वाढले आहेत.
5. पुढील निवडणुकांमध्ये पाटील स्वबळावर उतरणार का?
→ अद्याप अधिकृत घोषणा नाही, पण त्यांच्या वक्तव्यातून स्वबळाची तयारी स्पष्ट होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.