NCP crisis News : स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना धक्का; आणखी एका बड्या नेत्याने सोडली साथ

Maharashtra politics 2025 News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊन एकच दिवस झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होऊन एकच दिवस झाला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आणखी एक बडा नेता त्यांची साथ सोडणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील-दुधगावकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत संजय पाटील दुधगावकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. मी पक्षाच्या अडचणीच्या काळात धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, यापुढील काळात काही अडचणीमुळे पक्षाचे काम करू शकत नाही. त्यामुळे मी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा, सक्रिय सदस्यत्वाचा व प्राथमिक सदस्यात्वचा राजनीमा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Sharad Pawar
Anuradha Adik BJP joining : अनुराधा आदिक भाजपमध्ये प्रवेश करणार? अशी चर्चा आहे; सुजय विखे म्हणाले...

संजय पाटील-दुधगावकर यांनी राजीनामा दिल्याने धाराशिव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. दोन महिन्यापूर्वीच पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी साथ सोडत ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे शरद पवार (Sharad pawar) यांच्या पक्षातून मोठ्या प्रमाणात इतरत्र नेतेमंडळी जात आहेत. दोन आठवड्यापूर्वीच पक्षातील तीन जिल्हाध्यक्षांनी साथ सोडली असताना आता त्यामध्ये आणखी भर पडली आहे.

Sharad Pawar
Shivsena UBT News : 'दगाबाज' सरकारला उद्धव ठाकरे जाब विचारणार! महिनाभरात दुसरा मराठवाडा दौरा करणार

मंगळवारीच नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची घोषणा झाली असताना दुसऱ्याच दिवशी संजय पाटील-दुधगावकर यांनी साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला असता त्यांनी काही अडचणीमुळे पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.

Sharad Pawar
Uddhav Thackeray News : माझा शेतकरी भोळाभाबडा, सरकारकडून त्याची थट्टा! मराठवाडा दौऱ्यात उद्धव ठाकरे संतापले

त्यासोबतच येत्या काळात कोणत्या पक्षासोबत जाण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. मात्र, लवकरच स्थानिक नेतेमंडळी व समर्थकांची बैठक घेणार आहे. त्या बैठकीतून येत्या काळात कोणत्या पक्षासोबत जायचे याबाबत सर्वानुमते निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी दुधगावकर काँग्रेस, भाजपमध्ये होते. त्यामुळे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar
Congress News : काँग्रेस अडकली गटबाजीत; निलंगेकर-साळुंकेंचे स्वतंत्र मेळावे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com