Mahayuti Leader Sarkarnama
मराठवाडा

Mahayuti News : महायुतीचे जागावाटप 'या' कारणांमुळे रखडले; भाजपने केला इतक्या जागांवर दावा

Political News : लोकसभेवेळी जागावाटप करण्यास महायुतीला विलंब झाला होता. त्याचा फटका बसला होता. त्यामुळे आता जागावाटप निश्चित करण्याची लगबग सुरु झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा महायुतीची पहिली बैठक झाली.

Sachin Waghmare

Mumbai News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणदेखील तापण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राची निवडणूक कधी जाहीर होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरित असला तरी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले असले तरी रखडले आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा होणार असल्याचे समजते.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) सपाटून मार खावा लागल्याने मोठा फटका बसला होता. त्यामुळे राज्यात यंदा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.

लोकसभेवेळी जागावाटप करण्यास महायुतीला विलंब झाला होता. त्याचा फटका बसला होता. त्यामुळे आता जागावाटप निश्चित करण्याची लगबग सुरु झाली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा महायुतीची पहिली बैठक झाली. त्यामध्ये जागावाटप जवळपास अंतिम टप्प्यात आले असले तरी भाजपने 288 पैकी 150 जागा मागितल्या असल्याने चर्चा रखडली असल्याचे समजते. (Mahayuti News)

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महायुतीमध्ये 60 पेक्षा अधिक जागा मागितल्या असल्याचे समजते. दुसरीकडे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने किती जागा मागितल्या आहेत ते समजत नाही. दुसरीकडे अजित पवार गटाने सध्या 54 आमदार या सोबतच काँग्रेसचे तीन आमदार आणि अपक्ष तीन आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी युवकांच्या मेळाव्यात बोलताना केला.

यावेळी सजीत पवार यांनी सॊबत असलेल्या आमदारांची नावे सांगत जागाच मागितल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे हिरामण खोसकर, झिशान सिद्धकी आणि सुलभा खोडके लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याची माहिती सांगितले. यासोबतच अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे हे देखील आपल्या सोबत असल्याचा उल्लेख अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार हे 60 पेक्षा कमी जागा घेणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

महायुतीच्या जागावाटपावेळी भाजपने 150 पेक्षा कमी जागा लढणार नसल्याची भूमिका घेतल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे आणखी एक वेळा यावर चर्चा होणार आहे. त्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे.

महायुतीमधील तीन पक्षाने जागेच्या हट्टापेक्षा जी जागा जो पक्ष जिंकून येऊ शकतो, त्यांनी लढावी अशी भूमिका आमची आहे. हट्टाने जागा घेणे व पुढे ती जागा पराभूत होणार नाही, यासाठी तिन्ही पक्ष पारदर्शकतेच्या चर्चा करून तोडगा काढत असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे अद्याप महायुतीच्या जागावाटपावर चर्चा सुरु असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT