Babanrao Lonikar-Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Babanrao Lonikar: मला एकदा खासदार करा अन् आपण सगळे मिळून रावसाहेब दानवेंना राज्यपाल करू; बबनराव लोणीकरांची तुफान टोलेबाजी

Babanrao Lonikar: जालना जिल्ह्याच्या राजकारणात हजरजबाबी आणि विनोदबुद्धी असलेल्या नेत्यांची कमी नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर या भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांसाठी नेहमीच पर्वणी असते.

Jagdish Pansare

Babanrao Lonikar: जालना जिल्ह्याच्या राजकारणात हजरजबाबी आणि विनोदबुद्धी असलेल्या नेत्यांची कमी नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर या भाजपा नेत्यांमधील जुगलबंदी त्यांच्या समर्थक, कार्यकर्त्यांसाठी नेहमीच पर्वणी असते. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुलाला बसवल्यानंतर लोणीकर काल जाम खूष होते.

नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या सत्कार समारंभात रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर, राजेश टोपे, बबनराव लोणीकर, नारायण कुचे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी दानवे आणि लोणीकर यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी भाषणं केली.

बबनराव लोणीकर यांनी यावेळी रावसाहबे दानवे यांचा 'कलाकार' असा उल्लेख करत एक किस्सा सांगितला. परतूरमध्ये एकदा मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आले होते, तेव्हा कारखान्यावर जातांना गाडीत रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून टाकले, की बबनराव लोणीकर आता काही विधानसभा लढवणार नाहीत, त्यामुळं त्यांना आता राज्यपाल करू टाका.

यावर माझे असे मत होते, की राज्यपाल होण्यासाठी हरिभाऊ बागडे यांच्यासारखे ७५ किंवा ८० वर्षे वय पाहिजे. या निकषात मी तर सध्या काही बसत नाही. उलट रावसाहेब दानवे यांचेच राज्यपाल व्हायचे वय झाले आहे. तेव्हा जिल्ह्यातील आपण सगळे मिळून देवाभाऊकडे जाऊ आणि रावसाहेब दानवे यांना राज्यपाल करा, असे सांगू असे म्हणत लोणीकरांनी दानवेंचीच दांडी उडवली.

विधासनभा लढवणार नाही, पण खासदार व्हायचयं.. मी पुढची विधानसभा निवडणूक लढवणार नाही, पण आता माझ्या मुलाला कुठे तरी चिकटवा, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. तसेच मला एकदा खासदार व्हायचे आहे, तोपर्यंत मी रिटायर्ड होत नाही असेही लोणीकर म्हणाले.

या वाक्यानंतर उपस्थितांना तुम्ही रावसाहेब दानवेंकडे पाहू नका, माझा दावा परभणी लोकसभा मतदारसंघावर आहे असे लोणीकरांनी स्पष्ट केले. राजकारणात अनेकदा नेते असं सांगतात की पुढची निवडणूक मी लढवणार नाही, प्रकाशदादा सोळंके 80 वर्षाचे झाले आहेत. त्यांनी यावेळी मी निवडणूक लढवणार नाही, माझा पुतण्या लढवेल असे सांगितले होते.

पण नंतर जनतेची इच्छा म्हणत तेच लढले आणि आमदार झाले. त्यामुळे राजकारण्यांवर फार विश्वास ठेवायचा नसतो, असेही लोणीकरांनी सांगून टाकले. एकूणच जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या सत्कार समारंभात लोणीकर-दानवे यांच्यात रंगलेल्या जुगलबंदीने उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT