Raosaheb Danve News Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा, युवामोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे पंतप्रधानांना रक्ताने लिहिले पत्र

Make Raosaheb Danve the Chief Minister, office bearer's letter written in blood : हे रक्ताने लिहिलेले पत्र गायके यांनी पंतप्रधान कार्यालयाला ईमेल केले आहे. दरम्यान गायके हे धनगर समाजाचे युवानेते असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Jagdish Pansare

जालना : भाजप नेते रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गायके यांनी पंतप्रधान नेरंद्र मोदी यांच्याकडे स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून केली आहे. विधासनभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यामध्ये भाजपला राज्यात 132 जागांवर विजय मिळाला आहे.

त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री भाजपचा व्हावा, अशी मागणी भाजप कार्यकर्ते करत आहेत. परंतु, राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपकडे की शिवसेनेकडे? यावर दिल्लीत खलबतं सुरू आहेत. (Raosaheb Danve) भाजपकडून देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विनोद तावडे आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत. आपल्या नेत्याचे नाव या शर्यतीत पुढे असावे यासाठी रक्ताने पत्र लिहण्याची स्पर्धा सध्या पक्षात लागल्याचे दिसते आहे.

अशावेळी शनिवारी (ता.30)जालना भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गायके यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करत स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पाठवले आहे.

हे रक्ताने लिहिलेले पत्र गायके यांनी पंतप्रधान कार्यालयाला ईमेल केले आहे. दरम्यान गायके हे धनगर समाजाचे युवानेते असल्याचा दावा त्यांनी केला आहे. रावसाहेब दानवे यांनी यापूर्वी सरपंच, पंचायत समितीचे सभापती, दोन वेळा आमदार, पाच वेळा खासदार, भाजप प्रदेशाध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री राहिले आहेत.

भाजप पदाधिकाऱ्याच्या या रक्ताने लिहलेल्या पत्रामुळे आता दानवे यांचे नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आले आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित समजले जात असले तरी अद्याप त्यांच्या नवाची अधिकृत घोषणा झालेली नाही.

रावासहेब दानवे हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संयोजक म्हणून नियुक्त केले होते. भाजप व महायुतीला राज्यात मिळालेल्या यशात दानवे यांचाही हात असल्याचे बोलले जाते. शिवाय राज्याचा मुख्यमंत्री मराठा असावा, असाही एक मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी करत समोर आलेल्या रक्ताने लिहलेल्या पत्राची चर्चा झाली नाही तर नवलच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT