मराठवाडा

Deshmukh Pattern : देशमुखांचा पॅटर्नच वेगळा; विधानसभेतील धक्क्यानंतर 3 साखर कारखान्यांची निवडणूक बिनविरोध

Dilip Deshmukh Amit Deshmukh Dheeraj Deshmukh Win : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना आणि विलास साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

सुशांत सांगवे

Latur News : महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात लातुरातील देशमुख कुटुंबाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, रेणा साखर कारखाना आणि विलास साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सलग 25 वर्ष निवडणूक बिनविरोध करत मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी सहकार क्षेत्रात नवा पॅटर्न निर्माण केला आहे.

लातुरातील या तिन्ही कारखान्यांचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख यांनी पुन्हा एकदा सहकारातील आपली ताकद दाखवून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर देशमुख कुटुंबाने कारखान्यांची निवडणूक बिनविरोध पार पाडली आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मांजरा परिवार वाढवला होता. याच परिवारातील साखर कारखान्यांचा पारदर्शक कारभारासाठी लौकिक आहे. त्यामुळेच गेल्या 25 वर्षांत कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक सातत्याने बिनविरोध झाल्या आहेत. तिन्ही साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनल’चे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख हे मांजरा कारखान्याच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच श्रीशैल्य उटगे, अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, ज्ञानेश्वर पवार, भैरू कदम, सदाशिव कदम, नीलकंठ बचाटे, सचिन शिंदे, दयानंद बिडवे, अनिल दरकसे, बाळासाहेब पांढरे, मदन भिसे, नवनाथ काळे, निर्मला चामले, वसंत उफाडे, कैलास पाटील, धनराज दाताळ, छायाबाई कापरे, शंकर बोळंगे यांचाही बिनविरोध उमेदवारांमध्ये समावेश आहे.

विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर अमित देशमुख, वैशाली विलासराव देशमुख, लताबाई देशमुख, रविंद्र काळे, नरसिंग बुलबुले, रसुल पटेल, गोवर्धन मोरे, वैजनाथ शिंदे, अनंत बारबोले, सतिश शिंदे (पाटील), दीपक बनसोडे, हणमंत पवार, नेताजी साळुंके, नितीन पाटील, रामराव साळुंके, तात्यासाहेब पालकर, रणजीत पाटील, अमृत जाधव, बरुरे शाम, भारत माने, सुभाष खंडेराव हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT