Manoj Jarange Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange News : ''ज्यांच्या तीन पिढ्या मराठा समाजाने मोठ्या केल्या तेच आज...'' ; मनोज जरांगेंचे टीकास्त्र!

Maratha Reservation : ''शासन २४ डिसेंबरपर्यत आरक्षण देईलच माञ काही दगा फटका झालाच तर...'' असंही जरांगे म्हणाले आहेत.

नेताजी नलवडे

ज्या पुढाऱ्यांच्या तीन पिढ्या मराठा समाजाने मोठ्या केल्या तेच पुढारी आज मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत. माञ आपण शांततेच्या मार्गाने केलेल्या आंदोलणाला यश मिळत असुन मराठा समाजाच्या हजारो कुणबीच्या नोंदी सापडत आहेत.

५० टक्याच्या आतच मराठा समाजाला सरसकट आरक्षण २४ डिसेंबरपर्यत सरकार देईल असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी वाशी येथील जाहीर सभेत बुधवार (ता.१५) रोजी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नियोजीत वेळेपेक्षाही तब्बल आठ नऊ तास उशीरा सुरु झालेल्या सभेला प्रचंड गर्दी होती. सकाळी अकरा वाजताची वेळ असलेली सभा राञी आठ वाजता सुरु झाली. जरांगे पाटील यांच्या तिस-या टप्यातील राज्याचा दौ-याची सुरवात बुधवारपासुन आंतरवाली सराटी येथुन झालेली आहे.

पहिली सभा वाशी येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयाच्या मैदानात पार पडली.सभेच्या निमित्ताने शहरात आलेल्या जरांगे पाटलांवर सकल मराठा समाजाच्या वतीने तब्बल १११ जेसीबीच्या साह्याने काँलेज रोड ते सभास्थळ दरम्याण पुष्पवृष्टी करुण त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

पुढे बोलताना त्यांनी सांगीतले २४ डिसेंबर पर्यंत शासन मराठाला समाजाला पन्नास टक्याच्या आतच कुणबी म्हणुन आरक्षण देईल माञ काही दगा फटका झालाच तर पुढील आंदोलणाची दिशा २४ डिसेंबरला जाहीर करण्यात येईल.तसेच एक डिसेंबर पासुन प्रत्येक गावात शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण सुरु करण्याचे व कोणीही आत्महत्या करु नये असे आवाहाण त्यांनी यावेळी केले.

माळी समाजाकडून एक टन वजनाचा हार घालून सत्कार -

तिसऱ्या टप्यातील पहिल्या सभेच्या निमित्ताने शहरात आलेल्या जरांगे पाटलांचा तालुक्यातील माळी समाजाच्यावतीने छञपती शिवाजी महाराज चौकात भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी क्रेनच्या साह्याने तब्बल एक टन वजनाचा हार जरांगे पाटील यांना घालुन मराठा आरक्षणाला व जरांगे पाटील यांच्या भुमिकेला माळी समाजाने पाठिंबा दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT