Shrirang Barne News : पक्ष फुटला,पण नातं टिकलं; शिंदे गटाचे बारणे अन् ठाकरे गटाच्या उबाळेंची अनोखी 'भाऊबीज'

Shivsena Political News : टोकाच्या संघर्षानंतरही शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांनी...
Shrirang Barne -Sulbha News
Shrirang Barne -Sulbha NewsSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटांतील संघर्ष टोकाला गेलेला असून त्याचा प्रत्यय ऐन दिवाळीत (ता.१०) मुंब्रा (जि.ठाणे) येथे आला. अशा परिस्थितीत सुद्धा या दोन्ही गटांतील दोन मोठ्या नेत्यांनी भाऊबीज बुधवारी साजरी केल्याने तो पिंपरी-चिंचवडमध्ये चर्चेचा विषय झाला.

मावळचे शिंदे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी ठाकरे शिवसेनेच्या पुणे जिल्हा संघटिका (शिरूर) सुलभा उबाळे यांच्या घरी जाऊन आज (ता.१५) भाऊबीज साजरी केली.बहिणीला भाऊबीजेची साडीची ओवाळणी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrirang Barne -Sulbha News
Sharad Pawar News : मकरंद पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; तेथेही किसन वीर कारखान्यांचीच पवारांना चिंता

बारणे हे थेरगाव,तर उबाळे या यमुनानगर,निगडीत राहतात. शिवसेनेच्या पिंपरी महापालिकेतील गटनेत्या राहिलेल्या उबाळेंचा प्रभाग भोसरी विधानसभा मतदारसंघात म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिंदे गटात गेलेले शिरूरचे तीनवेळचे शिवसेनेचे माजी खासदार,उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या सुलभा उबाळे(Sulbha Ubale) या कट्टर समर्थक समजल्या जात होत्या.तर, मावळचे खा. बारणेंच्या त्या मानलेल्या बहिण आहेत. आजी,माजी खासदार शिंदे गटात गेल्यानंतरही कट्टर आणि आक्रमक शिवसैनिक असलेल्या उबाळेंनी मूळ शिवसेनेतच राहणे पसंत केले.

पक्ष दुभंगल्यानंतर भाऊबीज साजरी करण्याचे बारणे,उबाळेंचे हे दुसरे वर्ष आहे. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे फायरब्रॅण्ड नेत्या अशी प्रतिमा असलेल्या सौ. उबाळे यांना भाऊ आहे.तसंच खा. बारणेंनाही बहिणी आहेत. तरीही त्यांनी एकमेकांना भाऊबहिण मानलेले आहेत.अपवाद वगळता .२१ वर्षापासून ते भाऊबीजच नाही,तर रक्षाबंधनही नियमितपणे साजरी करीत आहेत.

शिवसेना (Shivsena) दुभंगल्यानंतर हे दोघे दोन वेगवेगळ्या गटात जाऊन एकमेकांचे प्रतिस्पर्धी झाले असले,तरी त्यांनी आपले भावाबहिणीचे नाते जपलेच नाही,तर ते कायम ठेवत वाढवले आहे.त्यामुळेच दोन्ही शिवसेनेतील तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यातील दिवाळी गोडवा तथा भाऊबीजेची चर्चा होत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Shrirang Barne -Sulbha News
Eknath Shinde at Gadchiroli: गडचिरोलीच्या पिपली बुर्गीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली ओवाळणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com