Manoj Jarange on Devendra Fadnavis Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange on Devendra Fadnavis : प्रशांत कोरटकर सापडेना, फडणवीसांवर जरांगे भडकले; म्हणाले, 'तुमचं हिंदुंत्व नको, आता धडा शिकवणार' (VIDEO)

Manoj Jarange Maharashtra CM Devendra Fadnavis police Prashant Koratkar Nagpur Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा नागपूर मधील प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नसल्यावरून मनोज जरांगे यांची सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Pradeep Pendhare

Maharashtra political news : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी गरळ ओकणारा नागपूरमधील प्रशांत कोरटकर विदेशात पसार झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोयरा आहे ना, सरकारचा! त्यामुळे तो सापडणार नाही. सर्व काही फडणवीस घडवून आणत आहेत. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नको देखील, आम्हाला छत्रपतींचा हिंदुंत्व मान्य आहे, असे जरांगे यांनी आक्रमक भूमिका मांडली.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आगामी काळात उभारण्यात येणाऱ्या आंदोलनापूर्वी मराठा (Maratha) सेवकांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, प्रशांत कोरटकर बेपत्ता होण्यावरून जरांगे यांनी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधला.

जरांगे म्हणाले, "प्रशांत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे ना, त्यामुळे तो सापडणार नाही. बाकीचे असते, तर नसते कशातरी मध्ये टाकले असते. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. हिंदूमधील (Hindu) काही जण राजा छत्रपतींना रोज अवमान करत आहेत". यांनी फक्त आमचा वापर भांडण्यासाठीच केला अन् राजकीय पोळ्या भाजून घेतल्या, असा आरोप जरांगे यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना, तुमचं हिंदुंत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुंत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही. महापुरूषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

प्रशांत कोरटकर सापडत नाही, यामागे पोलिसांचे अपयश नाही. सर्व काही फडणवीस घडवून आणत आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला. अपमान करणारे सगळे त्याचे सोयरे आहेत. एक टोळी तयार करून, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरूषांचा ही टोळी रोज अपमान करत आहेत. त्यांचे हिंदुत्व फक्त दाखवायला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT