
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रूर आणि सूड भावनेने वागणारा नेता आहे. त्यांनी आतापर्यंत आमच्या समाजाचा फक्त वापर करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. हिंदू धर्मासाठी लढणारी जात म्हणजे मराठा, पण ही जातच संपवायला देवेंद्र फडणवीस निघाले आहेत, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा आणि इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे. तो विदेशात पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manojjarange Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे त्यामुळे तो सापडणार नाही. क्रूर आणि सूडपणे देवेंद्र फडणवीस हा माणूस वागतो आहे. माझ्या समाजाचा त्याने नुसता वापर केला असा, घणाघात जरांगे पाटील यांनी केला.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यापासून प्रशांत कोरटकर फरार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून त्याला अभय दिले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर हा फरार आहे, पोलिसांना तो सापडत नाही. आता तर तो विदेशात पळून गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरच गंभीर आरोप केले.
मराठा समाजाचा आतापर्यंत त्यांनी समाजा समाजामध्ये भांडण लावण्यासाठी आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच वापर केला, असा आरोप जरांगे यांनी केला. प्रशांत कोरटकर हा सरकारचा सोयरा आहे, त्यामुळे तो सापडणार नाही. बाकीचे असते तर कशात तरी आत टाकले असते. कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून मकोकासारख्या कलमाखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांवर तुमचं खरं प्रेम आहे तर मग हिंदू समाजातीलच काहीजण रोज छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कसा करतात? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
तुमचे हिंदुत्व आम्हाला न परवडणारे आहे ते आम्हाला नको. आम्हाला फक्त छत्रपतींचे हिंदुत्व मान्य आहे. यापुढे महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवणारच, असा इशारा जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही हे त्यांचे अपयश नाही तर देवेंद्र फडणवीस हे सगळं घडवून आणतो तो त्याचा सोयरा आहे. महापुरुषांचा अपमान करणारे सगळे त्याचे सोयरे आहेत त्याने एक टोळीच तयार केली आहे, जी छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा सातत्याने अपमान करते.
त्यांना बळ कोण देतो, बोलायला कोण सांगतो? असा प्रश्नही जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस यांना गोरगरिबांच्या मुलांचं वाटोळ करायचं आहे. गेल्या 70 वर्षात आमचा फक्त भांडणासाठी वापर केला, आम्हाला हिंदू मानता पण आमचा घात करता. धर्माचं रक्षण करणारी आमची जात तुम्ही संपवायला निघालात ,असा आरोपही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.