Amol Khune allegations on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पटोदा (जि. बीड) येथून मुंबईत जाण्याचे आंदोलन मागे घेतले. सरकारला पुढे 90 दिवसांचा अल्टिमेटम दिला. परंतु त्यांच्या या कृतीवर जरांगे पाटील विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरूवात केली आहे.
जरांगे पाटलांचे जुने सहकारी अमोल खुणे समोर येत, आंदोलनामागील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना एकनाथ शिंदे शिवसेनेमधील अंतर्गत कलहाचे राजकारण उघडे पाडले आहे.
अमोल खुणे यांच्या म्हणण्यात जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनामागे एकनाथ शिंदे शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस असल्याचे सांगितले. ईडी चौकशीत हे सगळे उघड होईल. रसद कुणी पुरवली, पैसे कसे वाटले गेले, हे सर्व समोर येईल.
शिवसेनेचे (Shivsena) नेते अब्दुल सत्तार आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यातील अंतर्गत धुसफूसवर, अमोल खुणे यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद हवे होते. यातून टार्गेट करण्यासाठी जरांगे पाटील यांना सुपारी दिली. यासाठी पुरवठा झालेल्या रसदीची चौकशी केल्यावर, सर्व काही समोर येईल. पुढील उपोषणाला सरकारमधील मंत्र्यांचे कोणतेही शिष्टमंडळ येणार नाही, असाही दावा अमोल खुणे यांनी केला.
मुंबईला आंदोलनाला निघताना, पब्लिक समोरच नाटकं केले, धरायला चार जण आणले, यावरून डिवचताना मराठ्यांचा इतिहास आहे एवढ्या लढाया झाल्या युद्ध झाले एक तरी मावळा कुठल्या मोहिमेवर रडत गेला का? जरांगे पाटील प्रत्येक लढाईला रडत जातो, असा टोला देखील अमोल खुणे यांनी लगावला.
मी जर चुकीचा असेल, तर माझ्यावर कायदेशीर कारवाई करावी. माझ्याविरोधात अब्रू नुकसानाची दावा दाखल करावा, असे प्रति आव्हान अमोल खुणे यांनी दिले.
अमोल खुणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे मराठवाड्यात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यातच उपचारानंतर जरांगे पाटील या सर्व दाव्यांवर काय भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.