Shrirampur school dispute : पतीच्या कथित संबंधांचा संशय; पत्नी थेट शाळेत, शिक्षिकेशी वाद

Wife confronts teacher at school over alleged relationship suspicion in Belapur : श्रीरामपूरच्या बेलापूरमधील प्राथमिक शाळेत गोंधळ; शिक्षिकेचे केस पकडल्याचा दावा, ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवली
Shrirampur school dispute
Shrirampur school disputeSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur news : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात एका प्राथमिक शाळेत घडलेल्या प्रकाराची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

पतीच्या एका प्राथमिक शिक्षिकेशी असलेल्या कथित संबंधांवरून संतप्त झालेल्या पत्नीने थेट शाळेत जाऊन संबंधित शिक्षिकेला जाब विचारल्याची घटना घडली. शाळा सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर परिसरातील स्वतःला पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून सांगणाऱ्या एका तरुणाची सुमारे वर्षभरापूर्वी परिसरातील एका प्राथमिक शाळेतील (School) शिक्षिकेशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढल्याचा आरोप आहे. संबंधित तरुण शिक्षिकेला शाळेत सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी वाहनाने नेवासा फाट्यापर्यंत जात असल्याचेही सांगितले जाते.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत होणारे WhatsApp चॅटिंग आणि वारंवार होणाऱ्या भेटीगाठींमुळे पत्नीला संशय आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर तिने पतीच्या हालचालींवर लक्ष ठेवले. अखेर पती आणि शिक्षिकेतील (Teacher) कथित संबंधांची माहिती मिळाल्यानंतर पत्नी संतप्त झाल्याचे सांगण्यात येते.

Shrirampur school dispute
Satyajeet Tambe News : शाळेत निधीची घोषणा, पालिकेत राजकीय ‘गुगली’; सत्यजित तांबेंचा श्रीरामपूर दौरा चर्चेत

यानंतर पत्नी थेट संबंधित प्राथमिक शाळेत पोहोचली. वर्गाबाहेर शिक्षिका दिसताच दोघींमध्ये वाद झाला. संतप्त पत्नीने शिक्षिकेचे केस पकडून जाब विचारल्याचा दावा करण्यात येत आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे शाळेच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. गोंधळ वाढत असल्याचे पाहून संबंधित शिक्षिकेने तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. घटनेची माहिती परिसरात पसरल्यानंतर ग्रामस्थही शाळेच्या आवारात जमा झाले.

Shrirampur school dispute
Shrigonda Municipal Council controversy : ‘दुसऱ्याची क्रेन का लावली?’; श्रीगोंद्यात नगरपरिषदेत भाजप नगरसेविकेच्या पतीचा मोठा राडा

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळा बंद ठेवत संबंधित शिक्षिकेविरोधात कारवाईची मागणी केल्याचे सांगण्यात येते. शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन या प्रकरणाची कशी दखल घेते, तसेच शाळेच्या आवारात झालेल्या गोंधळाबाबत पुढे काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे: या प्रकरणातील कथित संबंध आणि इतर आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्तींची बाजू तसेच अधिकृत चौकशीतील निष्कर्ष समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com