Manoj Jarange Patil, Pankaja Munde, Dhananjay Munde Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange: पंकजा मुंडेंच्या राजकारण सोडण्याच्या विधानावरुन धनंजय मुंडे टार्गेट! मनोज जरांगेंनी लगावला टोला

Manoj Jarange: मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी उद्विग्नेतून केलेले वक्तव्य आणि राजकारण सोडून द्यावेसे वाटते अशी व्यक्त केलेली भावना, यातून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Jagdish Pansare

Manoj Jarange: मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनी उद्विग्नेतून केलेले वक्तव्य आणि राजकारण सोडून द्यावेसे वाटते अशी व्यक्त केलेली भावना, यातून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 'सध्या जातीपातीचे गलिच्छ राजकारण पाहून यातून बाहेर पडावेसे वाटते, अशी खंत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका करताना तुझ्यामुळेच जातीयवाद वाढला, तुझ्यामुळं बहिणीलाही भोगावं लागतंय, आता तरी शहाणा हो, अशा शब्दात सल्ला दिला. 'उशिरा का होईना शहाणपण आलं, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला.

मंत्री पंकजा मुंडे यांनीही "माझ्या विचारांशी राजकारण जुळले नाही, तर समृद्धी महामार्गासारखा राजकारणातून माझाही एक्झिट असेल", असे विधान केले होते. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या या विधानावर भाष्य करताना जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले. जरांगे म्हणाले, "जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता आले नाही. मराठ्यांसह सगळ्या जातींनी तुला मोठं केलं आणि तुमच्या टोळीने त्यांनाच ओरबाडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊ दिला ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला. तू शहाणा हो मराठ्यांच्या नादी लागू नको. कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत," असा इशारा जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला. जातीपातीचं राजकारण यानेच आणलं, सगळ्याच जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केला, अशा शब्दांत सडकून टीकाही केली.

अत्याचार करणाऱ्याला सांभाळावं लागेल असं म्हणतो. आता तू पाश्चाताप करायला लागलास. तुला उशिरा का होईना शहाणपण आलं बरं झालं, तुझ्यामुळे बहिणीला सुद्धा भोगावं लागत आहे, अशा शब्दांत जरांगेंनी मुंडे यांना सुनावले. परळीत ज्या मराठ्यांनी मोठं केलं, त्यांचे मुडदे पाडले. जातीवाद तुम्ही केला. संतोष देशमुख प्रकरणी न बोलणं हा जातीवाद नाही का? माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या देणं जातीवाद नाही का? बलात्कार करणाऱ्याला सांभाळावं लागेल म्हणतो. याला आता कंटाळा यायाल लागला. मुडदे पाडायचे, बलात्कार करायला लावायचे, खंडण्या मागायला लावायच्या आणि आता पश्चाताप करत आहे.

उशिरा शहाणपण आलं ते तरी बरं झालं. आम्हाला काही अडचण नाही. मराठ्यांच्या नादी लागू नको, गुन्हे करणाऱ्याला साथ देऊ नको. लाभार्थी टोळीमुळे वंजारी आणि मराठा समाजात दुरावा आला, असा हल्लाही जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर चढवला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT