Manoj Jarange targets Eknath Shinde Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : "एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी घेतले..."; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Manoj Jarange Patil on Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील म्हणाले, "एका नेत्याने मला याविषयी सांगितले,माझ्याकडे पुरावे आहेत. शिंदेसाहेब माझ्या नावाने तुम्ही पैसे घेतले. भाजपच्या नेत्यांना तुम्ही मनोज जरांगेंना पैसे हवेत म्हणून सांगून हे पैसे तुम्ही घेतले. हे खरं आहे की खोटं आहे याचं उत्तर मला द्या."

Jagdish Patil

Beed News, 20 Oct : मनोज जरांगे पाटील यांनी नारायण गडावरील दसरा मेळाव्यात मोठा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, "मी उपोषणाला बसलो असताना मला सातव्या आठव्या दिवशी कळालं की, एकनाथ शिंदेसाहेबांनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले आणि मनोज जरांगे पाटील याला दिले. त्यांचे पु्त्र श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते हे पैसे दिले." त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, "एका नेत्याने मला याविषयी सांगितले,माझ्याकडे पुरावे आहेत. शिंदेसाहेब माझ्या नावाने तुम्ही पैसे घेतले. भाजपच्या नेत्यांना तुम्ही मनोज जरांगेंना पैसे हवेत म्हणून सांगून हे पैसे तुम्ही घेतले. हे खरं आहे की खोटं आहे याचं उत्तर मला द्या. आज दसरा मेळाव्यात द्या नाहीतर उद्या संध्याकाळ पर्यंत द्या," असं आवाहन मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदेंना केलं आहे.

तर याबाबत आपणाला एका नेत्याने सांगितलं असून माझ्याकडे याबाबतचे पुरावे आहेत, असा दावाही जरांगेंनी केला. ते म्हणाले, "शिंदेसाहेब माझ्या नावाने तुम्ही पैसे घेतले. भाजपच्या नेत्यांना तुम्ही मनोज जरांगेंना पैसे हवेत म्हणून सांगून हे पैसे तुम्ही घेतले. हे खरं आहे की खोटं आहे याचं उत्तर मला द्या. आज दसरा मेळाव्यात द्या नाहीतर उद्या संध्याकाळ पर्यंत द्या. माझ्याविषयी काही गोष्टी कळल्यानंतर त्यावर मी पांघरून टाकायला हवे. मात्र, मी तसे करणार नाही.

'दिल्लीच्या भाजपच्या काही नेत्यांना, महाराष्ट्राच्या भाजपच्या काही नेत्यांना शिंदेसाहेब तुम्ही सांगितले की, जरांगे पाटलांना 500 कोटी द्यायचे आहेत. आता तुम्ही खरं सांगा भाजपकडून 500 कोटी घेऊन मला दिले हे भाजपच्या नेत्यांना तुम्ही सांगितले का? श्रीकांत भैय्या शिंदे यांच्या हाताने 500 कोटी पोहोचले, असे तुम्ही भाजपला सांगितले आणि तुम्ही जर मला दिले नसतील तर मग भाजप तुम्हाला संपवतंय की तुम्ही मला संपवताय याचा छडा लावल्याशिवाय मी राहणार नाही, असं जरांगे म्हणाले.

जरांगे पाटलाला कसा मारायचा?

दरम्या, यावेळी जरांगेंनी त्यांना मारण्यासाठी प्लॅन सुरू असल्याचा मोठा आरोप केला. ते म्हणाले, "इतकी भयंकर गुप्त चर्चा आहे की, जरांगे पाटीलला कसा मारायचा? त्याच्यात एका माजी मुख्यमंत्र्याचं नाव आहे. तो बाळासाहेब ठाकरे साहेबांना म्हटला बाळासाहेब ठाकरे माझा बाप आहे. त्यात असली कमेंट आहे ती बघितली तर तो उद्याच पक्ष सोडेल. तीस चाळीस मिनिटांची भयंकर चर्चा आहे. ती जर तुम्ही ऐकली तर म्हणाल आपल्या जरांगे पाटलाला किती वेदना दिल्यात यांनी. आणि हे अडीच वर्षानंतर उघडं पडलं आहे.ठ

खरं-खोटं सिद्ध करा

तसंच जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना खरं-खोटं सिद्ध करून दाखवण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "तुम्ही भाजप नेत्यांना खोटं बोलून मला 500 कोटी द्यायचे म्हणून पैसे का आणले? आणि जर तुम्ही आणले नसतील तर आणले नाही असं सांगा. तुम्ही खरं सांगा किंवा खोटं सांगा दोन्हीत सामना करायची माझी तयारी आहे.

तुम्ही आजच्या दसऱ्या मेळाव्यात उत्तर द्या. नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत सांगा, पण आता मी याच्या मुळाशी जाणार आहे, मी फक्त उत्तर मागितलं आहे. ते त्यांच्या त्यांच्यात म्हणतायत "श्रीकांत शिंदेंनी माझ्याकडे पैसे दिले," आणि हे मला आता कळतंय, असंही जरांगे यावेळी म्हणाले. तर जरांगे पाटलांच्या या आरोपांमुळे आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून त्यांच्या या वक्तव्यानंतर आजच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT