Sangli Bank Election : सांगली जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार? CM फडणवीस-चंद्रकांत पाटलांच्या हालचाली, जयंत पाटलांशी चर्चेची शक्यता

Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोधसाठी महायुतीतील घटक पक्षांना त्यांच्या राजकीय ताकदीनुसार जागा देण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाच्या सूत्रावर सहमती होते का, याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सांगलीत स्वतंत्र बैठक घेतली.
Sangli District Bank Election | Fadnavis | Jayant Patil
Sangli District Bank Election | Fadnavis | Jayant PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News, 20 Oct : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील संघर्ष आता बिनविरोधच्या दिशेने वळण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि बँकेची भक्कम आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये खलबते सुरू आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांच्या चर्चेतून यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.

या बैठकीत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्याचा पर्यायही मांडण्यात आला. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि बँकेचा सुरू असलेला कारभार पाहता राजकीय संघर्ष टाळून निवडणूक बिनविरोध करण्याला प्राधान्य द्यावे, अशी भूमिका शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे.

Sangli District Bank Election | Fadnavis | Jayant Patil
Satara NCP : अजितदादांनंतर महायुतीत गृहित धरलं जातंय! राष्ट्रवादीच्या बैठकीला कार्यकर्त्यांची दांडी; मकरंद पाटलांसमोर खुर्च्या रिकाम्या

बिनविरोधसाठी महायुतीतील घटक पक्षांना त्यांच्या राजकीय ताकदीनुसार जागा देऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव चर्चेत असल्याचे समजते. त्यामुळे जागावाटपाच्या सूत्रावर सहमती होते का, याला महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सांगलीत स्वतंत्र बैठक घेतली.

Sangli District Bank Election | Fadnavis | Jayant Patil
NAFED Onion Scam : नाशिकचा कांदा डावलून परराज्यातील निकृष्ट कांद्याला पसंती; नाफेडमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार, शेतकरी उपाशी अन् अधिकारी तुपाशी!

या बैठकीला जयंत पाटील, मानसिंगराव नाईक, खासदार विशाल पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. जिल्हा बँकेची निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. मात्र, बिनविरोध निवडीचा प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करण्याची तयारीही दर्शविण्यात आल्याचे समजते.

आता जयंत पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या चर्चेतून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होतो का आणि दोन्ही आघाड्या निवडणूक बिनविरोध करण्यावर एकमत साधतात का, याकडे सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com