Satara NCP : अजितदादांनंतर महायुतीत गृहित धरलं जातंय! राष्ट्रवादीच्या बैठकीला कार्यकर्त्यांची दांडी; मकरंद पाटलांसमोर खुर्च्या रिकाम्या

Makarand Patil on Satara Politics : साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत मकरंद पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करण्याचे तसेच त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Makarand Patil
Makarand Patil addresses NCP leaders and workers during a meeting in Satara ahead of the Graduate and Teacher constituency elections.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News, 20 Oct : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनीच बैठकीकडे पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे, मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील उपस्थित असतानाही सभागृहातील अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे.

त्यातच राष्ट्रवादीच्या या बैठकीला स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अपेक्षित उपस्थिती नसल्याने पक्षातील नाराजी पुन्हा एकदा समोर आली. बैठकीतील रिकाम्या खुर्च्यांकडे मंत्री मकरंद पाटील यांचेही लक्ष गेले. त्यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे आज उपस्थिती नसल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले.

Makarand Patil
Gokul election result : महायुतीच्या नेत्यांचा गाजावाजा, मतदारांचा हिसका! गोकुळमध्ये ‘अंडर करंट’ने फिरवला गेम

यावेळी मकरंद पाटील यांनी महायुतीतील व्यवहाराबाबतही नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महायुतीत आपल्याला गृहित धरले जात असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. अजितदादांच्या निधनानंतर आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याची भावना त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त झाली. त्यांच्या या विधानामुळे साताऱ्यातील महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

Makarand Patil
Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं! तिघांची गोळ्या घालून हत्या; संतप्त नागरिकांनी मृतदेह थेट मुख्यमंत्र्यांच्या दारात ठेवले

दरम्यान, बैठकीत मकरंद पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी काम करण्याचे तसेच त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, पक्षाच्या बैठकीलाच स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याने त्यांच्या या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Satara DCC Bank Election Update
Makarand Patil-Jaykumar Gore
Satara Dcc Bank Election
Satara Crime | Teacher Father Arrested
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com