Sanjay Shirsat Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil audio clip : पाचशे कोटींचा आरोप असणारी ऑडिओ बाहेर आणली कोणी? महायुतीत भांडणे लावणारा कोण? संजय शिरसाट यांचा रोख कोणाकडे?

Manoj Jarange Patil alleged ₹500 crore audio clip sparks Mahayuti row. Shiv Sena leader Sanjay Shirsat calls for a forensic probe : मनोज जरांगे पाटील यांनी ऑडिओ बाॅम्बचे धमाक्यांवर मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली आहे.

Jagdish Pansare

Sanjay Shirsat reaction : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टाकलेल्या ऑडिओ बाॅम्बचे धमाके महायुतीच्या कानठळ्या बसवणारे ठरत आहेत. पाचशे कोटी रुपये मनोज जरांगे पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत पोचवण्यात आल्याचा उल्लेख या ऑडिओमध्ये आहे.

यावरून जरांगे पाटील यांनी रान उठवले असून या ऑडिओमधील लोकांचा शोध घ्या,एकनाथ शिंदे किंवा मला बदनाम करण्याचा, संपवण्याचा डाव भाजपाचा आहे का? असा सवाल करत जरांगे पाटील यांनी महायुतीला कोंडीत पकडले आहे. भाजपाने या ऑडिओ क्लिपचे कर्तेकरविते संजय राऊत असल्याचा आरोप केला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना आम्हालाही संशय आहे, म्हणूनच आम्ही चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही ऑडिओ फाॅरेन्सीक लॅबमधून तपासली जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही ऑडिओ क्लीप बाहेर कोणी आणली? याच्या आडून महायुतीमध्ये भांडणे लावणारा कोण? हे समोर येईल, असे म्हटले आहे. आता त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? यावर चर्चा सुरू झाली आहे.

500 कोटीच्या प्रकरणात जे वादळ पाहायला मिळत आहे, त्यात कुणी घेतले कुणी आणले? अशा चर्चा आहेत. जी काही व्हाईस क्लिप आहे, त्यातील आवाजवरून वाद सुरू झाला, आम्ही आधीच सांगितले याची फॉरेन्सिक चौकशी केली पाहिजे. आवाज कुणाचे आहे सर्वांना माहीत आहे, हा वाद वेगळ्या दिशीन चालला आहे. यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा विषय बाजूला गेला आहे. आस्तीन का साप कोण है? हे समोर येईलच, पण तोपर्यंत आपापसात मतभेद होऊ नयेत, अशी अपेक्षा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केली.

टेपमधील आरोप सर्वांना माहीत आहे, अनेक गोष्टी त्यात आहेत, एवढी खाजगी टेप बाहेर येत असेल तर बाहेर आणणारे कोण आहेत? आतापर्यंत आवाज असलेल्या लोकांनी मान्य केलं नाही की यात आमचा आवाज नाही. संशय आहे आम्हाला देखील म्हणून आम्ही चौकशीची मागणी केली असल्याचे शिरसाट म्हणाले. यावरून महायुतीत मतभेद होतील आणि आम्ही एकमेकांचे कपडे फाडू, असे जर कोणाला वाटत असेल तर ते होणार नाही, असे शिरसाट सांगायला विसरले नाहीत.

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपाच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याकडे लक्ष वेधले असता प्रत्येक प्रश्नाला उत्तर देत बसलो तर राजकारणात कुणी कमी नाही, प्रत्येकाला टोकाचे बोलता येते, चांगले बोलता येते. पण आता हे थांबवले पाहिजे, सर्वसामान्य लोकांकडून यावर राग वक्त होतात, वरच्या नेत्यांना बोलू द्या, असे सांगत शिरसाट यांनी यावर अधिक बोलणे टाळले. रामदास कदम एकटे पडलेले नाहीत, ते आमच्या पक्षाचे जेष्ठ नेते आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडली आहे, त्याची दखल एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT