Manoj Jarange Patil audio clip : जरांगेंची बाजू घेत, रामदास कदमांवर मंत्री राणेंची टोलेबाजी; उद्धव ठाकरेंना गुदगुल्या होतील, असे न वागण्याचा सल्ला

Alleged audio clip sparks a political row as Nitesh Rane questions Ramdas Kadam criticism of the BJP : रामदास कदम यांनी कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर टीका केल्यानंतर नीतेश राणेंनी प्रत्युत्तर दिले. क्लिपची चौकशी सुरू असल्याचे सांगत ती बनावट ठरल्यास काय, असा सवालही राणेंनी उपस्थित केला.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nitesh Rane Ramdas Kadam controversy : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी, राज्याच्या राजकारणात पाचशे कोटी रुपयांच्या कथित ऑडिओ क्लिपच्या आरोपावरून मोठे वादळ उभे झाले. सत्ताधाऱ्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली असतानाच आता विरोधकांनीही यात उडी घेतली.

भाजप मंत्री नीतेश राणे यांनी, जरांगे पाटील यांच्या प्रामाणिकपणावर शिक्कामोर्तब करताना, एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांना चांगलेच सुनावले आहे. कदम यांच्या अशा भूमिकेमुळे उद्धव यांना गुदगुल्या होत असतील. त्यांना चांगली झोप येत असेल. महाविकास आघाडीला आनंद होईल, असे कदम यांनी वागू नये, असेही मंत्री राणे म्हणाले.

जरांगे पाटील यांच्या कथित ऑडिओ क्लिपच्या आरोपावरून रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी, थेट भाजपवर हल्लाबोल केला. यावरून मंत्री नीतेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली. रामदास कदम हे त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना विचारून भूमिका मांडतात की नाही, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या क्लिपचा संबंध त्यांनी भाजपशी जोडू नये, असे नीतेश राणे यांनी सुनावले.

एकनाथ शिंदे यांना संपविण्यासाठी भाजपचा (BJP) प्लॅन असल्याची टीका निराधार आहे. यामुळे महायुतीच्या संबंधांमध्ये मिठाचा खडा पडत आहेत. याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. तसेच जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांचे सर्वांनाच कौतुक आहे, असेही मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले.

Nitesh Rane
Pradeep Purnekar murder investigation : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; पिस्तुले यूपीमधून, तर चॉपर मुंबईतून खरेदी

मंत्री राणे पुढे म्हणाले, "कदम यांची भूमिका शिंदे यांना मान्य आहे आहे का? हा आमचा सवाल आहे. एकनाथ शिंदे भाजपबद्दल कधीच बोलणार नाहीत. देवाभाऊंची आणि त्यांची जोडी राम-लखनसारखी आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव नावाच्या रावणाचे आपण दहन केले आहे. भाजप नाही, तर उद्धव ठाकरे शिंदेंना संपवत होते."

Nitesh Rane
Ahilyanagar firing : अहिल्यानगर हादरलं! फ्लॅटमध्ये घुसून महिलेवर गोळीबार; काही तासांत गोळीबार करणाऱ्या तरुणाचाही मृत्यू

महाविकास आघाडीत शिंदेंची अवस्था काय होती हे सर्वांना माहिती आहे. भाजप आणि देवाभाऊंनी त्यांना साथ दिल्याने त्यांना मुख्यमंत्री होता आले. त्यांना साथ मिळाली नसती, तर शिंदेंचे उद्धव यांनी काय केले असते, याची कल्पना करता येणार नाही. कदम यांच्या अशा भूमिकेमुळे उद्धव यांना गुदगुल्या होत असतील. त्यांना चांगली झोप येत असेल. महाविकास आघाडीला आनंद होईल, असे कदम यांनी वागू नये, असेही राणे म्हणाले.

क्लिप बनावट निघाली तर...

तथाकथित क्लिपची शहानिशा केली जात आहे. त्याची चौकशी केली जाईल. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर दूध का दूध, पाणी का पाणी होईल. पण जर ही क्लिप जर बनावट निघाली, तर मग काय? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. कारण कदम यांच्या टीकेमुळे भाजप कार्यकर्ते दुखवले गेले आहेत, असेही मंत्री राणे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com