Chhatrapati sambhaji nagar News, 29 Sep : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पाटोदा येथील उपोषण स्थगित केल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. अकरा दिवस उपचार घेतल्यानंतर विश्रांतीचा सल्ला देत डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला.
त्यानंतर ते अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे ज्या डिफेंडरचा वापर जरांगे पाटील करतात त्यावरून बराच वाद आणि टीका त्यांच्यावर झाली होती. दरम्यान, रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी ही डिफेंडर गाडी परत पाठवून दिली होती. आज पुन्हा याच गाडीतून ते रुग्णालयातून आपल्या अंतरवाली सराटी या गावी परतले आहेत. पाटोद्यातील उपोषण स्थगित करून छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील उपचार घेत असताना इकडे अंतरवालीत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या.
मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवालीतील उपोषणाला गावकऱ्यांचा विरोध असल्याच्या चर्चेनंतर गावातील उपोषण मंडप काढून टाकण्यात आला होता. जरांगे पाटील यांनी देखील अंतरवालीतील हे आपले शेवटचे निर्णायक आंदोलन आहे, असे जाहीर केले होते. त्यानंतर गावातील महिला आंदोलक ललिता तारख यांनी स्थानिक माध्यमांना प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता जरांगे पाटील हे अंतरवालीत परतले आहेत. पुढील दहा दिवस आपण कोणालाही भेटणार नाही, आपल्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. दहा दिवसानंतर आपण पुन्हा नव्या जोमाने समाजाच्या प्रश्नावर कामाला लागणार असल्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. अगदीच महत्त्वाचे काम असले तरच भेटायला या, अन्यथा कोणीही भेटण्यासाठी अंतरवालीत येऊ नये, असे जरांगे पाटील यांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी उठाव करावा..
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्यापुर्वी जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तीन महिने आपण कुठल्याही टीकेला उत्तर देणार नाही. माझ्यासाठी मराठा समाजाचा लढा महत्त्वाचा आहे. मराठवाड्यात दुष्काळ आहे, शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसला आहे. पण सरकार अजूनही मदत करायला तयार नाही.
शेतकऱ्यांनी कधी तरी एकजूट दाखवून या सरकारच्याविरोधात उठाव करावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. एकरी तीस-पस्तीस हजारांच्या मदतीसाठी शेतकऱ्याला वाट पहावी लागते. एकदा शेतकऱ्यांनी उठाव केला तर सरकार तुमच्या दारात पळत येईल आणि मदत देईल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.