S Chokalingam : आधी दोन आयुक्त, आता महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचेही थेट आयोगाला पत्र; कशावर घेतलाय आक्षेप?

S Chokalingam letter to Election Commission : चोकलिंगम यांनी आयोगाल पाठविलेल्या पत्रात ‘ECINet’ सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्याचे सुचविले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ईआरओंना त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याची सुविधा मिळायला हवी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
Maharashtra election officer letter to Election Commission
S Chockalingam raises objection to ECINET softwareSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra CEO news : केंद्रीय निवडणूक आयोगातील आयुक्तांमधील मतभेद समोर आल्यानंतर देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. या मतभेदांवर आयोगाकडून खुलासाही करण्यात आला आहे. सर्व निर्णय संमतीनेच घेतल्याचा दावा आयोगाने केला आहे. त्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनीही आयोगाकडे काही आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे.

सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत विविध मुद्द्यांवर आयोगाकडे १४ आक्षेप नोंदविल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते. या आक्षेपांमध्ये SIR शी संबंधित काही महत्वाच्या मुद्यांचा समावेश होता. नवीन ‘ECINet’ सॉफ्टवेअरमध्ये निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणजेच EROचे अधिकार कमी करण्यात आल्याचा म्हटले होते.

चोकलिंगम यांनीही याच अनुषंगाने मागील आठवड्यात आयोगाला पत्र लिहून चार बदल करण्याची मागणी केली आहे. सध्या महाराष्ट्रात एसआयआर अंतर्गत आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याच कालावधीत चोकलिंगम यांनी हे पत्र धाडल्याने त्याला महत्व प्राप्त झाले आहे. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे. त्यानुसार चोकलिंगम यांनी २४ सप्टेंबर रोजी आयोगाला पत्र लिहिले आहे.

Maharashtra election officer letter to Election Commission
Fadnavis government news : दुष्काळात फडणवीस सरकारने माजी अधिकाऱ्यांसाठी तिजोरी उघडली; रश्मी शुक्ला, गुप्तांसह चौघांना 4 आलिशान कार

काय केल्या आहेत मागण्या?

चोकलिंगम यांनी आयोगाल पाठविलेल्या पत्रात ‘ECINet’ सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्याचे सुचविले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये ईआरओंना त्यांच्या अधिकारांचा वापर करण्याची सुविधा मिळायला हवी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. ईआरओंना हे अधिकार नसल्याने नव्या मतदारांची त्यांच्या पातळीवर नोंदणी करता येत नाही. गोव्यातही असाच प्रकार घडल्याचे समोर आले होते. जवळपास ९७ मतदारांबाबत आयोगाला पत्र लिहूनही त्यांची नोद झाली नव्हती.

कोणत्या मतदारांना वैयक्तिक सुनावणीसाठी बोलाविण्याचा अधिकार ईआरओंना आहे. त्यानुसार ईसीआयनेटमध्येही तसा पर्याय असावा. जेणेकरून मतदारांनी अपेक्षित कागदपत्रे दिल्यास त्यांना सुनावणीतून सूट देता येईल. प्रामुख्याने ज्येष्ठ, दिव्यांग आणि अन्य संवेदनशील समुहांना दिलासा मिळेल, असे चोकलिंगम यांनी म्हटले आहे.

Maharashtra election officer letter to Election Commission
CJI Surya Kant News : ही फक्त पोटनिवडणूक, Thats all! मतदार दुसऱ्यांदा वंचित राहतील, या युक्तिवादावर सरन्यायाधीशांचे विधान

ईसीआयनेटमध्ये अन्य कागदपत्रांचाही पर्याय देण्याची मागणीही करण्यात आली आहे. असे केल्यास आयोगाने आधीच दिलेल्या कागदपत्रांच्या यादीतील कागदपत्रे नसतील तरी अन्य कागदपत्रांच्या आधारे मतदारांची नोंदणी शक्य होईल. त्याचप्रमाणे काही कागदपत्रांच्या आधारे ईआरओ यांना मतदारांची ओळख पटल्यास त्यांच्या पातळीवर निर्णय घेण्याची सुविधा असावी, असे चोकलिंगम यांनी सुचविले आहे.

काही प्रकरणांमध्ये जुन्या एसआयआरच्या प्रति अपलोड करणे अनिवार्य असू नये, अशी शिफारसही त्यांनी केली आहे. तसेच ईआरओ यांच्यासाठी लिखित दिशानिर्देश त्याचप्रमाणे सातत्याने विचारण्यात येणाऱ्या प्रश्न व त्यांची उत्तरे उपलब्ध करून देण्याची मागणीही चोकलिंगम यांनी पत्राद्वारे आयोगाकडे केली असल्याचे वृत्ता म्हटले आहे. दोन्ही निवडणूक आयुक्तांनीही ‘ECINet’ सॉफ्टवेअरच्या केंद्रीय नियंत्रणावर प्रश्न उपस्थित केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com