Sangli Bank Election : जयंत पाटलांच्या कट्टर विरोधकांना शुभेच्छा; चंद्रकांतदादांशी गुफ्तगू : विशाल पाटलांच्या राजकारणामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

Sangli District Bank election Politics : भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याचे संकेत दिले. विशाल पाटील यांनी रविवारी पालकमंत्री पाटील यांना फोन केला. त्यावेळी पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितले.
Chandrakant Patil, Vishal Patil, Jayant Patil
Vishal Patil and Chandrakant Patil amid discussions over the Sangli District Bank election and political developments.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sangli News, 29 Sep : सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या सोमवारच्या दिवसभरातील कृतींमुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये वेगळाच रंग भरला आहे. पाटील यांनी भाजपच्या सम्राट महाडिक यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. महाडिक हे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांची गुप्तगू झाल्याने नव्या मैत्रीच्या घडामोडींमागचे रहस्य वाढले आहे.

त्याचवेळी माजी खासदार संजय पाटील यांनी चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप करून खळबळ उडवून दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. बँक निवडणुकीसाठी आज अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये विद्यमान संचालक राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांचा समावेश आहे.

पालकमंत्री व खासदार यांच्यात चर्चा झाल्यानंतर भाजपचे उमेदवार राहुल महाडिक व सम्राट महाडिक अर्ज भरण्यासाठी आले असता खासदार विशाल पाटील यांनी पुष्पगुच्छ दिल्याने या घडामोडीमागचे रहस्य पुन्हा वाढले. मात्र, यावर विशाल पाटील यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी राहुल महाडिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे सांगून आपली सुटका करून घेतली.

Chandrakant Patil, Vishal Patil, Jayant Patil
Tukaram Mundhe : राऊतांनी FDA अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांना तुकाराम मुंढेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, "त्यांचे पत्रच मिळालं नाही, आरोप प्रसारमाध्यमांमधून..."

भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पालकमंत्री पाटील आणि खासदार पाटील यांच्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाल्याचे संकेत दिले. विशाल पाटील यांनी रविवारी पालकमंत्री पाटील यांना फोन केला. त्यावेळी पाटील यांनी शासकीय विश्रामगृह व जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगितले.

पालकमंत्र्यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कॉलेजवर असल्याचे सांगितले. तुम्हाला चालत असेल तर माझी भेट घेऊ शकता, असे खासदारांना सांगितले. खासदार पाटील यांनी कॉलेजवर जाऊन चर्चा केली. त्यावेळी पालकमंत्री पाटील यांनी, ‘मी आत्ताच जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात बैठक घेतली. तुमचं काय काय चाललंय?’ असे विचारले. एवढेच सांगितले. त्यामुळे या भेटीचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Chandrakant Patil, Vishal Patil, Jayant Patil
Assembly Election news : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडणुकीची रणधुमाळी; ममतादीदींची प्रतिष्ठा पणाला, भाजपचा डाव फसणार की गड मजबूत होणार?

दुष्काळाबाबत चर्चा

खासदार विशाल पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांच्याशी संपूर्ण सांगली जिल्ह्यातच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केल्याचे सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत पालकमंत्र्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री पाटील यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी हजर असताना जिल्हा बँक निवडणुकीबाबत चर्चा कशी होऊ शकते, असे खासदारांनी सांगितले. भेटीमागे कोणताही राजकीय संदर्भ नसून दुष्काळाच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचा त्यांचा दावा आहे. खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनाही आपण पालकमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितल्याचे स्पष्ट केले.

पालकमंत्री आणि खासदार यांच्यात मॅच फिक्सिंग

जिल्हा बँक ही प्रमुख सहकारी संस्था आहे. तिची निवडणूक पक्षीय जोडे बाजूला काढून झाली पाहिजे. एकीकडे आघाडी-युतीचे स्वतंत्र पॅनेल लावण्याची चर्चा होते, दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्या गुप्त बैठका होतात. मॅच फिक्सिंगचे हे प्रयत्न कशासाठी, असा आरोप माजी खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com