Manoj Jarange Patil  Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांच्याकडे उमेदवारीसाठी किती अर्ज? महायुती, महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवणारा आकडा...

Manoj Jarange Patil Assembly Election : खुप लोक इच्छुक आहेत. मला यातलं काही कळत नाही म्हणून आम्ही माणसं बसवली आहेत. उमेदवार पाहिले की असे वाटते कुठून या लफड्यात पडलो, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Roshan More

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही, याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. 29 ऑगस्टला निवडणुकीच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र, विधानसभा निवडणूक एक महिना पुढे गेल्याने आपली भूमिका नंतर जाहीर करणार असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

'महाराष्ट्रातील 700 ते 800 इच्छुकांनी आपली भेट घेतली आहे. मला वाटलं होतं मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील पण पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. मराठवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे', असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

खुप लोक इच्छुक आहेत. मला यातलं काही कळत नाही म्हणून आम्ही माणसं बसवली आहेत. उमेदवार पाहिले की असे वाटते कुठून या लफड्यात पडलो. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी सर्वाधिक आपल्याशी संपर्क साधल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

संपूर्ण कर्जमाफीसाठी आंदोलन

मनोज जरांगे यांनी आपले पुढील आंदोलन हे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी असणार आहे, हे स्पष्ट केले आहे. प्रत्येकवेळी सरकार शेतकऱ्यांना फसवते आता ते कर्जमाफी कसे नाही करत हे पाहतो. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या अनुषंगाने बैठक घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महायुतीला फायदा झाल नाही का?

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे बोलले जाते. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्हाला आमची ताकद दाखवणे गरजेचे आहे. जळगाव, सातारा, पुण्यात काय झाले. महायुतीलाही फायदा झाला नाही का? त्यांनी फक्त नाही म्हणावे मग मी सांगतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT