Manoj Jarange Patil Sarkarnama
मराठवाडा

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा टोकाचा निर्णय! ना मंडप, ना पाणी; आता थेट रखरखत्या उन्हात उपोषण

Maratha Reservation Hunger Strike : "मला अंतिम टोकाचं आणि कठोर उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात बाज टाकून मी हे उपोषण करणार आहे. या उपोषणात मी पाणी पिणार नाही, जेवण करणार नाही, शिवाय पायात चप्पल घालणार आहे. माझ्या जीवात अनेक वेदना आहेत."

Jagdish Patil

Manoj Jarange Patil Hunger Strike : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या आंदोलनाची घोषणा केली. जरांगे पाटील यांनी ३० मेपासून आपण कठोर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली.

यावेळी हे आंदोलन आपण मंडपात बसून किंवा सावलीत करणार नाही. शिवाय उपोषणाच्या ठिकाणी फॅन लावणार नाही, मंडप टाकणार नाही, तर केवळ रखरखत्या उन्हात उघड्यावर बसून आपण कठोर उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं.

जरांगे म्हणाले, "मला अंतिम टोकाचं आणि कठोर उपोषण करायचं आहे. रखरखत्या उन्हात बाज टाकून मी हे उपोषण करणार आहे. या उपोषणात मी पाणी पिणार नाही, जेवण करणार नाही, शिवाय पायात चप्पल घालणार नाही. माझ्या शरीरात अनेक वेदना आहेत. उष्णघाताचा बळी गेला तरी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमुळे गेला.

कितीही जीवाची लाहीलाही झाली तरीही हरकत नाही. कारण तर माझ्या समाजाच्या लेकरांच्या आयुष्याचा उन्हाळा झाला आहे," असं जरांगेंनी यावेळी म्हणाले. दरम्यान, हे आंदोलन कुठेही होईल, एखाद्या रानात किंवा जंगलात होईल पण हे कठोर आंदोलन होईल आणि यावर मी ठाम आहे, असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. शिवाय यावेळी सरकारचा किंवा माझा तुकडा पडेल या फायनल भुमिकेवर मी आलो आहे.

किती दिवस सरकारला वेळ द्यायचा आणि किती दिवस आंदोलन करायचं? असा सवाल करत आता आपण कठोर आंदोलन असल्याचं त्यांनी जाहीर केलं. शिवाय सरकारने एक महिन्याचा वेळ मागितला होता. आता वेळ देऊन दहा महिने झाले त्यामुळे आता कुठेतरी हे थांबलं पाहिजे. एकदाचं होऊन जाऊदे यासाठी आपण हा कठोर निर्णय घेतल्याचंही जरांगे म्हणाले.

तसंच यावेळी त्यांनी अंतरवाली सराटीमध्ये कुणीही येऊ नये, असं आवाहन मराठा समाजाला केलं आहे. शिवाय जगात कुठेही आमरण उपोषण झालं नसेल असं टोकाचं उपोषण उपोषण होणार, असं जरांगेंनी यावेळी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT