Bangladesh Albino Donald Trump Buffalo : सोशल मीडियामुळे अनेक जण रात्रीत स्टार झाल्याची अनेक उदाहरणं आपण याआधी पाहिली आहेत. मात्र, आता सोशल मीडियामुळे चक्क ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या एका म्हशीचे प्राण वाचल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांपासून जगभरात बांगलादेशमधील एक दुर्मिळ म्हैस सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या म्हशीचं नाव अल्बिनो असं आहे. मात्र, या म्हशीचा मध्यम पांढरा रंग आणि माथ्यावर असणारे सोनेरी केसांमुळे तिला डोनाल्ड ट्रम्प असे नाव दिल्यामुळे ती जगभरात फेमस झाली होती.
सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळेच आता या म्हशीला जीवदान मिळालं असून ईदच्या निमित्ताने तिची कुर्बानी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेश सरकारच्या गृह मंत्रालयाने अल्बिनो अर्थात 'डोनाल्ड ट्रम्प' या म्हशीची कुर्बानी रद्द केल्याचं बुधवारी जाहीर केलं.
जवळपास 700 किलोची ही दुर्मिळ अल्बिनो म्हशीची कुर्बानीसाठी कत्तलखान्याला विकण्यात आली होती. मात्र, या म्हशीचे फोटो व्हायरल झाल्याने बांगलादेश प्रशासनाने म्हशीची दखल घेतली. शिवाय या म्हशीला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक गर्दी करू लागले.
त्यामुळे अखेर गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी म्हशीला जीवदान देत तिला ढाका येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. शिवाय म्हैस खरेदी करणाऱ्याला पैसे परत करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे अखेर ट्रम्प यांच्यासारख्या लुकमुळे म्हशीला जीवदान दिल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्य प्रमाणात रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सध्या जगभरात बकरी ईद साजरी केली जात आहे. ईदला मुस्लिम समुदायामध्ये जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. बांगलादेशमध्येही अल्बिनो म्हशीची कुर्बानी दिली जाणार होती. पण ही म्हैस तिच्या रंगामुळे आणि सोनेरी केसांमुळे व्हायरल झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सारख्या लुकमुळे तिचे टोपन नाव 'डोनाल्ड ट्रम्प' असे ठेवण्यात आले. सोशल मीडियावर ही म्हैस ट्रेंडिंग होताच तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. त्यानंतर म्हशिची प्रसिद्धी लक्षात घेता बांगलादेश सरकारने ईदच्या निमित्ताने तिची कुर्बानी देण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी रद्द केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.