Durgadi Fort Controversy : बकरी ईदनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूना प्रवेशबंदी : शिंदे अन् ठाकरेसेना आक्रमक, शिवसैनिक थेट बॅरिकेटवर चढले अन्...

Bakri Eid Durgadi Fort Shivsena Protest : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आजचा दिवस हिंदूना या किल्ल्यावर प्रवेश केली आहे. मात्र, शिवसैनिकांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हणत आंदोलन छेडलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी 'दुर्गाडी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा', अशा घोषणा द्यायला सुरूवात केली आहे.
Durgadi Fort Row | Bakri Eid | Shiv Sena Protest
Shiv Sena workers protest near Durgadi Fort in Kalyan after the administration restricted Hindu entry during Bakri Eid namaz preparations.Sarkarnama
Published on
Updated on

Durgadi Fort Shivsena Protest : बकरी ईदनिमित्त कल्याणामधील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदुना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली आहे.

आक्रमक झालेल्या दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ला परिसरात सकाळपासून आंदोलनाला सुरूवात केली आहे. आज बकरी ईदनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर मुस्लिम समाजातील लोक नमाज अदा करण्यासाठी किल्ल्यावर गेले आहेत.

याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आजचा दिवस हिंदूना या किल्ल्यावर प्रवेश केली आहे. मात्र, शिवसैनिकांनी हा निर्णय अयोग्य असल्याचं म्हणत आंदोलन छेडलं आहे. यावेळी शिवसैनिकांनी 'दुर्गाडी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा', अशा घोषणा द्यायला सुरूवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

Durgadi Fort Row | Bakri Eid | Shiv Sena Protest
Operation Lotus : 'आप'नंतर भाजपच्या रडारवर महाराष्ट्रासह देशातील 4 मोठे पक्ष : घटनादुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना हादरे?

दरम्यान, शिवसैनिकांकडून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. तर आक्रमक शिवसैनिक थेट बॅरिकेटींगवर चढून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरवर्षी कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ नमाज पडला जातो.

यंदाही ईदनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर नमाज पठण केलं जात आहे. यावेळी किल्ल्यावर हिंदूना प्रवेशबंदी केल्याने दोन्ही शिवसेना आक्रमक झाल्या आहेत. याचा निषेध म्हणून सेनेकडून आता घंटानाद करून इथे आंदोलन केलं जाणार आहे.

Durgadi Fort Row | Bakri Eid | Shiv Sena Protest
Ahilyanagar News : धक्कादायक! ग्रामीण रुग्णालयाचा आत्महत्याग्रस्त तरुणाच्या शवविच्छेदनास टाळाटाळ, पैशांची मागणीही; संतप्त तरुणांचा ठिय्या

तर या ठिकाणी शिवसेनेकडून आधीपासूनच आंदोलन केलं जातं. दुर्गाडी किल्ल्यावरील नमाज पठणाला शिवसेनेचा पहिल्यापासून विरोध असून दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशानंतर आनंद दिघे यांनी १९८२ पासून इथे घंटानाद करत आंदोलनाला सुरूवात केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com